भारतीय नोटांवर महात्मा गांधींचाच फोटो का असतो? हे कोणी ठरवलं?

भारताच्या चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटो असावा हे कोणी आणि कधी ठरवलं? यामागे नेमका काय इतिहास आहे जाणून घ्या.  

| Sep 30, 2024, 19:12 PM IST

भारताच्या चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटो असावा हे कोणी आणि कधी ठरवलं? यामागे नेमका काय इतिहास आहे जाणून घ्या.

 

1/9

गुजरातमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे, जिथे नोटांवर महात्मा गांधींच्या जागी अभिनेते अनुपम खेर यांचा फोटो छापण्यात आला आहे.   

2/9

भारतीय नोटांवर महात्मा गांधी यांचाच फोटो छापलेला असतो. यामागे नेमकं काय कारण आहे जाणून घ्या.  

3/9

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही नोटांवर ब्रिटीश राजवटीची छाप होती. स्वातंत्र्यानंतर काही वर्षं भारतीय नोटांवर किंग जॉर्ज VI यांचा फोटो होता.   

4/9

RBI ने किंग जॉर्ज यांचा फोटो असणाऱ्या नोटा छापणं सुरु ठेवलं होतं. 1949 मध्ये भारत सरकारने 1 रुपयाच्या नोटेचं आपलं डिझाईन जारी केलं.   

5/9

यासह किंग जॉर्ज यांच्या जागी अशोक स्तंभाचा फोटो छापण्यात आला.   

6/9

सुरुवातीला किंग जॉर्ज यांच्या जागी महात्मा गांधी यांचा फोटो छापला जाईल अशी शक्यता दर्शवली जात होती.   

7/9

महात्मा गांधी यांची राष्ट्रीय स्तरावरील लोकप्रियता पाहता हा निर्णय घेण्यात आला होता. 1996 मध्ये आरबीआयने महात्मा गांधी सीरिज लाँच केली.   

8/9

1969 मध्ये पहिल्यांदा महात्मा गांधींचा फोटो भारतीय नोटेवर झळकला. त्यांच्या 100 व्या जन्मदिवसानिमित्त हा निर्णय घेण्यात आला होता.   

9/9

या नोटेवर गव्हर्नर एल के झा यांची स्वाक्षरी होती. फोटोत गांधीजींच्या मागे सेवागाम आश्रम दाखवण्यात आला होता.