माजी पंतप्रधान मनमोहन सिंग नेहमी निळी पगडीच का परिधान करतात?

पांढरा शुभ्र कुर्ता, निळी पगडी, डोळ्यांवर चष्मा आणी धीरगंभीर चेहरा, असं व्यक्तिमत्व असलेले भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे सोमवारी संसदेत सहभागी झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा मनमोहन सिंग हे चर्चेत आले आहेत. 

| Aug 08, 2023, 19:26 PM IST

पांढरा शुभ्र कुर्ता, निळी पगडी, डोळ्यांवर चष्मा आणी धीरगंभीर चेहरा, असं व्यक्तिमत्व असलेले भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे सोमवारी संसदेत सहभागी झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा मनमोहन सिंग हे चर्चेत आले आहेत. 

1/5

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग नेहमी निळी पगडीच का परिधान करतात?

Why Manmohan Singh Always Wear Blue Turban know the Secret

वयाची नव्वदी गाठलेल्या मनमोहन सिंग यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नाही. तरीदेखील सोमवारी ते संसदेत दाखल झाले होते. डॉ. मनमोहन सिंग व्हीलचेअरवर बसून सभागृहात आले होते त्यांनी राज्यसभेच्या कामात सहभाग घेतला. त्यांचे सभागृहातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

2/5

निळ्या रंगाच्या पगडीतच का?

Why Manmohan Singh Always Wear Blue Turban know the Secret

 डॉ. मनमोहन सिंग यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी मात्र एक प्रश्न सगळ्यांना पडला आहे. दरवेळी  डॉ. मनमोहन सिंग हे निळ्या रंगाच्या पगडीतच का दिसतात? या मागे काही खास कारण आहे का? हे आज जाणून घेऊया. 

3/5

कॅम्ब्रिज विद्यापीठ

Why Manmohan Singh Always Wear Blue Turban know the Secret

2006मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांना कॅम्ब्रिज विद्यापीठातून डॉक्टर ऑफ लॉ देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. यादरम्यान, तत्कालीन ड्यूक ऑफ एडिनबर्ग आणि विद्यापीठाचे कुलपती प्रिन्स फिलिप यांनी सिंग यांची पगडी आणि त्या रंगाकडे लोकांचे लक्ष वेधले होते. यानंतर, माजी पंतप्रधानांनी ते नेहमी याच रंगाची पगडी का परिधान करतात हे सांगितलं होतं. 

4/5

ब्लू टर्बन

Why Manmohan Singh Always Wear Blue Turban know the Secret

पीटीआयच्या एका लेखानुसार, मनमोहन सिंग यांनी म्हटलं होतं की, ते केंब्रिजमध्ये शिकत असताना नेहमी याच रंगाची पगडी घालायचे. त्यावेळी त्याच्या मित्रांनी त्याचे टोपणनाव 'ब्लू टर्बन' ठेवले होते.

5/5

केंब्रिजचे रंग

Why Manmohan Singh Always Wear Blue Turban know the Secret

 माजी पंतप्रधानांनी पुढे सांगितले की ते त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांपासून केंब्रिजचे रंग सोबत घेत आहेत. निळ्या रंगाची पगडी घालण्यामागील एक महत्त्वाचे कारण सांगताना, ते म्हणाले की, हा रंग त्यांचा अत्यंत आवडता आहे. त्यामुळं ते नेहमी याच रंगाची पगडी परिधान करतात.