नागा साधू केस कापू शकतात का? काय आहेत केस कापण्याचे नियम?
Naga Sadhu Hairs : पौष पोर्णिमेपासून प्रयागराज येथे महाकुंभ 2025 ला सुरुवात झाली असून करोडोंच्या संख्येने जगभरातील भाविक येथे दाखल झाले आहेत. महाकुंभात सहभागी होणाऱ्या नागा साधूंबद्दल अधिकाधिक गोष्टी जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. संपूर्ण शरीराला भस्म लावलेले आणि निर्वस्त्र होऊन मोह मायेचा त्याग केलेल्या नागा साधूंचे जीवन फार कठीण असते. नागा साधूंची अजून एक ओळख म्हणजे त्यांची लांब आणि जटाधारी केस. तेव्हा नागा साधूंना केस कापण्याबाबत कोणते नियम पाळावे लागतात याविषयी जाणून घेऊयात.



नागा साधू लांब केस का ठेवतात?

नागा साधूंच्या लांब केसांचा संबंध हा त्यांच्या आध्यात्मिकता, ध्यान, आणि तपस्येशी आहे. सोबतच लांब केस ठेवणे हे नागा साधूंच्या जीवनशैलीचा आणि त्यांचा व्यक्तिमत्वाचा भाग आहे. नागा साधूंचं म्हणणं असतं की लांब केस त्यांच्या मेंदूमध्ये अधिक ऊर्जा खेचतात आणि केसांमधून वैश्विक ऊर्जा वाहते. म्हणून नागा साधू लांब केस ठेवतात आणि केस कापणं टाळतात

