Shravan Tips: श्रावणात रानभाज्या का खाव्यात? जाणून घ्या महत्त्वं आणि भाज्यांची ओळख

Shravan Tips: श्रावण हा सणांचा महिना म्हणूनही ओळखला जातो. असं म्हणतात की, भगवान शंकरांना श्रावण हा महिना अत्यंत प्रिय आहे. हिरवागार निसर्ग, ऊन पावसाचा खेळ आणि आजूबाजूला असलेलं धार्मिक वातावरण यासगळ्याने श्रावण अनेकांना आवडतो. पावसाचे दिवस असल्याने श्रावणात शेताताच्या किंवा जंगलाच्या जवळ रानभाज्या आलेल्या असतात. इतर भाज्यांची सहसा लागवड केली जाते पण रानभाज्या या निसर्गत: येतात. 

Aug 05, 2024, 11:47 AM IST
1/10

या सगळ्यासोबत श्रावण म्हटलं की आठवतात त्या रानभाज्या. पावसाचे दिवस असल्याने श्रावणात शेताताच्या किंवा जंगलाच्या जवळ रानभाज्या आलेल्या असतात. इतर भाज्यांची सहसा लागवड केली जाते पण रानभाज्या या निसर्गत: येतात. 

2/10

असं म्हणतात ज्या सिझनमध्ये जे येतं ते खावं त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. श्रावणात येणाऱ्या रानभाज्या चविष्ट तर लागतातच पण त्या आरोग्यदायी देखील आहेत.   

3/10

श्रावणात पावसामुळे सूर्यप्रकाश जास्त मिळत म्हणून रोगराई वाढू नये यासाठी मांसाहार खाणं टाळावं असं सांगितलं जातं. म्हणूनच शरीराला पोषक घटक मिळावेत यासाठी रानभाज्या खायलाच पाहिजेत असं तज्ज्ञ सांगतात. 

4/10

टाकळा

याची पानं बदामाच्या आकारासारखी दिसतात. ही भाजी उष्ण असते. जर तुम्हाला थंडीमुळे संधीवाताचा त्रास होत असेल तर टाकळ्याची भाजी खाणं फायदेशीर ठरतं. या भाजीनमुळे पचनक्रिया सुधारते.     

5/10

कुरडू

कुरडूची भाजी श्रावणात खाल्लीच जाते. या भाजीमुळे युरीनच्या समस्या दूर होतात. तुम्हाला जर मूत्राशयासंबंधित आजार असतील तर कुरडूची भाजी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. काही जण टाकळा आणि कूरडूची मिक्स भाजी करतात.   

6/10

श्रावण घेवडा

हा घेवडा खास श्रावणातच मिळतो. श्रावण घेवड्यामध्ये प्रोटीन आणि खनिजं मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी श्रावण घेवडा फायदेशीर आहे. 

7/10

कोवळ्या बांबूची भाजी

कोकणातल्या काही भागांत कोवळ्या बांबूची भाजी केली जाते. कोवळ्या बांबूची भाजी खाल्याने शरीराला आवश्यक असलेले क्षार मिळतात.   

8/10

भारंगी

भारंगीची फुलं आणि पानांची भाजी श्रावणात खाणं फायदेशीर ठरतं. भारंगीच्या पाल्यामध्ये पोषक घटक असतात.  सर्दी, सायनस, वाताच्या त्रास असलेल्या रुग्णांनी श्रावणात भारंगी आवर्जून खावी. 

9/10

एक पानी

ही वनस्पती रानात किंवा शेताजवळच्या पाणथळ जागी येते. याच्या कोवळ्या पानाची भाजी केली जाते. या वनस्पतीला एकच पान असतं, म्हणून तिला एक पानी असं म्हणतात. एक पानीची भाजी खल्ल्याने हिमोग्लोबीनची मात्रा वाढते. 

10/10

कुडाच्या शेंगा

याच्या कोवळ्या शेंगांची भाजी केली जाते.  कुडाच्या शेंगा चवीला कडवट असतात.म्हणून त्या गरम पाण्यात उकडून त्याची भाजी केली जाते. उकडल्यामुळे त्याचा कडवटपणा कमी होतो. लहान मुलं खात नाहीत म्हणून टाकळा किंवा कुरडूच्या भाजीत या शेंगा मिक्स करुन याची भाजी करतात.  या भाजीमुळे दमा, अस्थमा आणि अतिसार दूर होतात.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)