American Diplomats: अमेरिकन डिप्लोमॅट ऑफिसला रिक्षानं का जातात? कारण ऐकून थक्क व्हाल

American Women Diplomats: दिल्लीच्या रस्त्यावर अमेरिकन डिप्लोमॅटची जोरदार चर्चा रंगली आहे. चार अमेरिकन महिला दूतावासात रिक्षानं जात असल्याने फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.  

Nov 24, 2022, 18:32 PM IST
1/5

us diplomates

अमेरिकेच्या चार महिला डिप्लोमॅट्स आपली आलिशान आणि बुलेटप्रूफ वाहने सोडून दिल्लीच्या रस्त्यावर ऑटो चालवत आहेत. ही बातमी आश्‍चर्यकारक वाटतं असली तरी खरी आहे. त्यांची छायाचित्रेही समोर आली आहेत.

2/5

us diplomates

एन एल. मेसन, रुथ होल्मबर्ग, शेरिन जे. किटरमन आणि जेनिफर बायवॉटर्स या चार महिलांची नावे आहेत. भारताशी संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं आहे. याला त्या 'आउट ऑफ बॉक्स' स्टाईल डिप्लोमसी म्हणत आहे.

3/5

us diplomates

मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांना भारतीय संस्कृती जवळून जाणून घेण्याची इच्छा आहे. यासोबत महिला प्रत्येक क्षेत्रात काम करू शकतात हा संदेश त्यांना द्यायचा आहे. 

4/5

us diplomates

भारतीय-अमेरिकन डिप्लोमॅट्स शेरिन जे किटरमन यांच्याकडे गुलाबी रंगाची ऑटो आहे. त्यावर अमेरिका आणि भारताचे ध्वज आहेत. त्यांचा जन्म कर्नाटकात झाला आहे. पुढे त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या असून त्यांच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे.

5/5

us diplomates

या चौघांपैकी एक अमेरिकन डिप्लोमॅट्स जेनिफर बायवॉटर्स यांनी सांगितले की, यामुळे त्यांना स्थानिक लोकांना जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळते.