Hardik Pandya: हार्दिकला टीममध्ये परत घेण्यासाठी मुंबई इंडियन्स मोजणार 'इतके' कोटी?

Hardik Pandya: आयपीएल (IPL-2024) च्या पुढील सिझनपूर्वी क्रिकेट चाहत्यांना मोठा बदल दिसण्याची शक्यता आहे. भारताचा T20 कर्णधार हार्दिक पंड्या यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) लिलावापूर्वी गुजरात टायटन्सला 'ट्रेडिंग'मध्ये सोडू शकतो. 

| Nov 25, 2023, 08:32 AM IST
1/7

हार्दिक गुजरात टायटन्स सोडून पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

2/7

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या माहितीनुसार, हा ट्रेड पूर्णपणे कॅशमध्ये होणार आहे. 

3/7

या ट्रेडसाठी मुंबई इंडियन्सची टीम गुजरात टायटन्सला 15 कोटी रुपये देणार असल्याची चर्चा आहे.

4/7

जर हा करार यशस्वी झाला तर कदाचित हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा प्लेयर ट्रेड असेल. 

5/7

दरम्यान या दोन्ही फ्रँचायझींनी अजून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.

6/7

आयपीएल 2023 च्या लिलावानंतर, मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये फक्त 0.05 कोटी रुपये (सुमारे $ 6000) शिल्लक होते. फ्रँचायझीला आगामी लिलावासाठी अतिरिक्त 5 कोटी रुपये (सुमारे $600,000) मिळतील.   

7/7

याचा अर्थ मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याचा समावेश करण्यासाठी काही खेळाडूंना रिलीज करण्याची शक्यता आहे. खेळाडूंच्या नोंदणीची अंतिम मुदत 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता संपणार आहे.