मासिक पाळीत केस धुवावे की नाही? तज्ज्ञ काय सांगतात...

महिला व तरुणींसाठी केस धुण्यासाठी वार ठरवून दिलेले असतात. असं म्हणतात की मासिक पाळीत केस धुवू नये, यामागे खरे कारण काय आहे. हे जाणून घेऊया

Nov 16, 2024, 12:35 PM IST

महिला व तरुणींसाठी केस धुण्यासाठी वार ठरवून दिलेले असतात. असं म्हणतात की मासिक पाळीत केस धुवू नये, यामागे खरे कारण काय आहे. हे जाणून घेऊया

1/7

मासिक पाळीत केस धुवावे की नाही? तज्ज्ञ काय सांगतात...

women do not allowed to wash hair during periods fact check report

आपल्या आई-आजीच्या म्हणण्यानुसार मासिक पाळीत केस धुवू नये. या दिवसांत केस धुणे अशुभ असते. मासिक पाळीच्या तिसऱ्या दिवशी केस धुवावे, असं तुम्ही ऐकलं असेलच. जाणून घेऊया यामागील कारण

2/7

 मासिक पाळीच्या दिवसांत केस धुतल्यास शरीरात थंडावा निर्माण होतो. त्यामुळं शरीरातून पाळीचे रक्त येत नाही. तसंच, आजच्या दिवसांत मासिक पाळीच्या दिवसांत केस धुतल्यास पीसीओएस आणि पीसीओडीसारख्या आजारांचा सामना करावा लागतो, अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामागचं खरं कारण जाणून घेऊया.

3/7

स्त्रीविषयक तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मासिक पाळीत केस धुणे अगदी सुरक्षित आहे. युनिसेफने दिलेल्या माहितीनुसार, केस धुतल्याने महिलांच्या मासिक पाळीवर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. 

4/7

मासिक पाळीत केस धुवू नये ही निव्वळ एक समजूत आहे. केस धुतल्याने पीरियड्सवर कोणातही परिणाम होत नाही. 

5/7

मासिक पाळीत केस का धुवू नये, यामागे अशीही एक समजूत आहे की, पीरियड पेनमध्ये शरीर उष्ण असावे लागते. पण जर केस धुतले तर शरीरात थंडावा राहतो. त्यामुळं अधिक त्रास जाणवू शकतो. गरम पाण्याने केस धुतले तर केस खराब होतात, अशीही एक मान्यता आहे. 

6/7

पण आरोग्यतज्ज्ञांच्या मते, मासिक पाळीत केस धुणे सामान्य आहे, या उलट मासिक पाळीच्या काळात शरीराची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. 

7/7

 (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)