ICC Women's T20 World Cup : या आहेत जगातील Top 10 महिला क्रिकेटर, त्यांच्या सौंदर्यापुढे अभिनेत्रीही फिक्या

ICC Women's T20 World Cup दक्षिण आफ्रिकेत सध्या महिला क्रिकेट वर्ल्ड कप खेळला जातोय. प्रत्येक संघ वर्ल्ड कप जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे. पण या अशा काही महिला क्रिकेटपटू आहेत, ज्या त्यांच्या खेळाबरोबर आपल्या सौंदर्यासाठी देखील ओळखल्या जात्यात. इतकंच नाही तर त्यांच फॅन फॉलोइंगही लाखोंच्या घरात आहे. आज आपण अशाच काही टॉप10 सुंदर महिला क्रिकेटपटूंच्या बाबतीत जाणून घेणार आहोत.

Feb 14, 2023, 16:14 PM IST
1/10

एलिसे पेरी

सौंदर्याच्या बाबतीत टॉप 10 मध्ये पहिला क्रमांक लागतो तो म्हणजे ऑस्टेलियन महिला क्रिकेट संघाची शानदार खेळाडू एलिसे अॅलेक्झेंड्रा पेरी (Ellyse Perry) हिचा. एलिसेचा जन्म 3 नोव्हेंबर 1990 झाला. वयाच्या 16 वर्षीच एलिसेने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात पदार्पण केलं. सौंदर्याच्याबाबतीत एलिसे हॉलीवूड अभिनेत्रींनाही मागे टाकते. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते उतावळे असतात. 

2/10

स्मृति मनधाना

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना (Smriti Mandhana) सध्याची सर्वात आक्रमक खेळाडू म्हणून ओळखली जाते. तिच्या खेळाबरोबर तिच्या सौंदर्याचेही अनेक चाहते आहेत. स्मृतीचा जन्म 17 जुलै 1996 मध्ये झाली. स्मृतीने आपल्या खेळाच्या जोरावर टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. तिच्या एका स्माईलवर चाहते फिदा असतात, तिचं फॅन फॉलोइंगही प्रचंड आहे. 

3/10

केट क्रॉस

सुंदर महिला क्रिकेटपटूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे इंग्लंड महिला क्रिकेट संघाची ऑलराऊंडर केट क्रॉस (Kate Cross). तिचं पूर्ण नाव कॅथरीन लॉरा क्रॉस असं आहे. तिचा जन्म 3 ऑक्टोबर 1991 मध्ये झाला. इंग्लंड संघाची ती ऑलराऊंडर क्रिकेटर आहे.

4/10

एम्मा लॅम्ब

एम्मा लॅम्बचा पूर्ण नाव एम्मा लुइस लॅम्ब (Emma Lamb) असं आहे. तिचा जन्म 16 डिसेंबर 1997 मध्ये झाला. सप्टेंबर 2021 मध्ये एम्मा आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळली. इंग्लंडची ही आक्रमक खेळाडू तिच्या सौंदर्यासाठीही नेहमीच चर्चेत असते. एम्मा फलंदाजीबरोबरच ऑफ स्पीन गोलंदाजही आहे. 

5/10

प्रिया पुनिया

स्मृती मंधनानंतर भारतीय क्रिकेटमध्ये सौंदर्याच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो ते म्हणजे प्रिया पुनियाचा (Priya Punia). प्रियाचा जन्म 6 ऑगस्ट 1996 मध्ये झाला. प्रिया सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. आपले अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. प्रियाने 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पण करत आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली.

6/10

कायनात इम्तियाज

कायनात इम्तियाज (Kainat Imtiaz) ही पाकिस्तान क्रिकेट टीम संघाची ऑल राउंडर खेळाडू आहे. फलंदाजीबरोबरच ती डाव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते. तिच्या सौंदर्यामुळे तिला चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. पाकिस्तानाच तिचे अनेक फॅन फॉलोअर्स आहेत. कायनात पाकिस्तानसाठी आतापर्यंत 15 एकदिवसीय आणि 21  टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळली आहे. 

7/10

सारा टेलर

इंग्लंड महिला क्रिकेट संघाची विकेटकीपर आणि फलंदाज सारा टेलर (Sarah Taylor) आपल्या खेळाच्या जोरावर महिला क्रिकेटवर राज करत होती. केवळ खेळच नाही तर तिच्या सौंदर्यालाही तोड नाही. साराचाा जन्म 20 मे 1989 मध्ये झाला.

8/10

किम गर्थ

आयर्लंड महिला क्रिकेट संघाची स्टार ऑलराऊंडर किम गर्थचा (Kim Garth) जन्म 25 एप्रिल 1996 मध्ये झाला. 2010 मध्ये किमने आयर्लंड क्रिकेट संघातत पदार्पण केलं. किम गर्थ खेळाबरोबरच तिच्या सौंदर्यासाठी देखील ओळखली जाते.

9/10

तानिया भाटिया

भारतीय महिला क्रिकेट संघाची विकेटकिपर आणि फलंदाज तानिया भाटीयाच्या (Taniy Bhatia) खेळाच्याही बऱ्याच चर्चा होत असतात. 28 नोव्हेंबर 1997 मध्ये पंजाबच्या चंदीगड शहरात तानियाचा जन्म झाला. तानिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपले अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. 

10/10

होली फर्लिंग

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील होली फर्लिंग (Holly Ferling) जितकी सुंदर दिसते तितकीच ती तिच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखली जाते. फर्लिंचा जन्म 22 डिसेंबर 1995 मध्ये झाला. तिच्या सौंदर्यामुळे लोक तिला प्रेमाने Bambi म्हणून ओळखतात.