खरीखुरी 'Rock'ing News! पुढील 100 वर्ष जगभरातील Electric Cars चार्ज करु शकणारा दगड सापडला

Electric Cars : भारतातही इलेक्ट्रिक वाहनांवर अनुदान मिळत असल्यामुळं या वाहनांना अनेकांचीच पसंती असल्याचं दिसून येतं. अशा या वाहनांसाठी एक अतिशय महत्त्वाची क्रांती नुकतीच घडली आहे.   

Jul 11, 2023, 09:59 AM IST

मागील काही वर्षांमध्ये जगभरात Electric Cars चा वापर वाढताना दिसत आहे. पर्यावरणाला केंद्रस्थानी ठेवत तयार करण्यात आलेल्या या कारमुळं इंधनाचीही आणि अर्थातच पैशांचीही मोठी बचत होत असल्याचं लक्षात येतं.

1/7

Electric Car

world news Phosphate discovery in Norway might  power electric cars for approx nect 100 years

तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत कोणी Electric Car चालवतं का? तर त्यांच्यासाठी ही सर्वाच महत्त्वाची बातमी. कारण, इथून पुढं अनेक वर्षांसाठी तुमच्या कारच्या चार्जिंगचा प्रश्न मिटणार आहे. 

2/7

चिंता मिटू शकते

world news Phosphate discovery in Norway might  power electric cars for approx nect 100 years

खूप म्हणजे तब्बल 100 वर्षांसाठी ही चिंता मिटू शकते. कशी ते एकदा पाहूनच घ्या. कारण, सध्या याच वृत्तानं संपूर्ण जगाच्या नजरा वळवल्या आहेत. 

3/7

Norge Mining

world news Phosphate discovery in Norway might  power electric cars for approx nect 100 years

खाणकाम क्षेत्रातील मोठं नाव असणाऱ्या Norge Mining या कंपनीकडून नॉर्वेच्या दक्षिण पश्चिम भागात सर्वात मोठे फॉस्फेटचे साठे सापडल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. 

4/7

70 बिलियन टन

world news Phosphate discovery in Norway might  power electric cars for approx nect 100 years

कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार हा साधारण 70 बिलियन टन इतका फॉस्फेट साठा आहे. ज्याचा पर्यावरण पूरक तंत्रज्ञानात मोठा हातभार लागणार आहे. 

5/7

प्रचंड साठा

world news Phosphate discovery in Norway might  power electric cars for approx nect 100 years

जागतिक स्तरावर बॅटरी आणि सोलर पॅनलमध्ये वापरात येणारा हा घटक आणि त्याला प्रचंड साठा साधारण 100 वर्षे पुरेल इतका असल्याचं वृत्त 'द इंडिपेंडंट'नं प्रसिद्ध केलं आहे. या क्षेत्रात फॉस्फेटसोबतच titanium आणि vanadium चे साठेही सापडल्याचं म्हटलं जात आहे. 

6/7

अपारंपारिक स्त्रोत

world news Phosphate discovery in Norway might  power electric cars for approx nect 100 years

प्रचंड मागणी असूनही phosphorus चा पुरवठा मात्र आतापर्यंत मर्यादित पातळीत असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं आता हा उर्जेच्या अपारंपारिक स्त्रोताचा हा शोध अत्यंत मदतीचा ठरणार आहे. नॉर्वेआधी रशियाकडे जगातिल सर्वात मोठ्या phosphate rock चे साठे होते. 

7/7

फॉस्फेटची मागणी

world news Phosphate discovery in Norway might  power electric cars for approx nect 100 years

जगभरात दरवर्षी साधारण 50 मिलियन टन फॉस्फेटची मागणी करण्यात येते. तज्ज्ञांच्या मते हेच सत्र सुरु राहिल्या जगातील फॉस्फेट साठा संपुष्टात येईल अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळं नॉर्वेतील हा शोध एक मोठा बदल घडवून आणणारा ठरेल.