World Osteoporosis Day 2023 : हाडे लोखंडासारखे टणक करतील 'हे' पदार्थ, हेल्दी बोन्सकरता फॉलो करा डाएट
World Osteoporosis Day 2023 : शरीराच्या संपूर्ण विकासाकरता हाडे मजबूत असणे अत्यंत गरजेचे असते. आपले खाणेपिणे ते अगदी काही विशिष्ट सवयी हाडांना कमकुवत करतात. ज्यामुळे भविष्यात ऑस्टियोपोरोसिसचे कारण ठरू शकते. अशावेळी या आजारापासून बचाव करण्यासाठी या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करावा.
Food For Good Bones : निरोगी आयुष्यासाठी हाडे मजबूत असणे गरजेचे असते. याकरता तुमचा आहार आणि सवयींकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी तुमचा आहार अत्यंत महत्त्वाचा असतो. मजबूत हाडांसाठी शरीराचा संपूर्ण विकास देखील व्यवस्थित होणे तेवढे गरजेचे असते. पण अनेक कारणांमुळे हाडे कमकुवत होतात. ज्यामुळे भविष्यात ऑस्टियोपोरोसिसचे कारण होऊ शकते. Healthline च्या रिपोर्टनुसार, या 7 पदार्थांचा हाडे मजबूत करण्यासाठी आहारात समावेश करा.
ऑस्टियोपोरोसिस हाडांशी संबंधित एक समस्या आहे. ज्यामध्ये हाडांची घनता कमी होते. ज्यामुळे हाडे कमकुवत होतात त्यामध्ये कोणतीच ताकद राहत नाही. याच उद्देशाने 20 ऑक्टोबर जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिवस साजरा केला जातो.