जगातील सर्वात आनंदी आणि सुखी देश

Dec 04, 2018, 13:51 PM IST
1/6

संयुक्त राष्ट्राने सगळयात सुखी अशा देशांची यादी जाहीर केली आहे. या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात भारताचा असंतुष्ट देशांच्या यादीत समावेश केला गेला होता.

2/6

सगळ्यात सुखी देशांच्या यादीत फिनलँड पहिल्या स्थानावर आहे. येथील पोलीस आणि इंटरनेट सुरक्षा जगातील सर्वात श्रेष्ठ मानली जाते. या देशात कायदे कठोरपणे पाळले जातात. त्यामुळे येथे गुन्हेगारी देखील कमी आहे. येथील नागरिकांचा राजकारण, पोलीस आणि कायदा यावर खूप विश्वास आहे.

3/6

सुखी देशांच्या यादीत नॉर्वे हा जगात दुसऱ्या स्थानावर आहे. येथील ब्रिगेन बंदर जगभरात प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी हजारो पर्यटक येतात. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज मध्ये या बंदराचा देखील समावेश आहे. हा देश बर्फाळ पर्वतांनी संपन्न आहे. जे या देशाचे प्रमुख आकर्षण आहे.

4/6

डेन्मार्क हा जगातील सर्वात सुखी देशांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. सगळ्यात शांत देशांच्या यादीत देखील या देशाचा क्रमांक लागतो. सगळ्यात कमी भ्रष्टाचार असलेल्या देशांच्या यादीत देखील डेन्मार्कचा समावेश करण्यात आला आहे.

5/6

आईसलँड हा जगातील चौथा सगळ्यात सुखी देश आहे. येथे दरवर्षी लाखो पर्यटक येतात. हिमनदी, नद्या, ज्वालामुखी हे येथील प्रमुख आकर्षण आहे. येथील धबदबा देखील पर्यटकांचं प्रमुख आकर्षण आहे.

6/6

पाचव्या स्थानावर न्यूझीलंड हा देश आहे. या देशाचा 60 टक्के भाग हा पर्वतांनी झाकलेला आहे. सुंदर पर्वत, गावं, सरोवर आणि येथील जीवनमान जगभरात प्रसिद्ध आहे. या देशाला नैसर्गिक सौंदर्य लाभलं आहे.