हे खोटे वाटणारे फोटो खरे आहेत

Feb 18, 2016, 16:34 PM IST
1/10

हे कोणत्यातरी कॉम्प्युटर खेळातील चित्र वाटते ना? पण नाही. मेक्सिको देशातील एका लहानशा नगरात तेथील नगरपालिकेने अशा प्रकारची घरे लोकांसाठी तयार केली आहेत. या पॅटर्न मुळेच हा फोटो असा आकर्षक दिसतो. 

2/10

हे कोण्या चित्रकाराने काढलेले चित्र नाही. तर हा आहे सेनेगल देशातील एक तलाव. पाण्यात मिठाचे प्रमाण वाढल्याने पाण्यातील काही प्रकारचे जीवाणू या तलावाच्या पृष्ठभागावर आले. त्यांची वाढ इतकी झाली की पाण्याचा रंग गुलाबी झाला. 

3/10

समुद्राच्या लाटा या नेहमीच समांतर असतात. पण, या चित्रात दिसणाऱ्या लाटा हवेच्या विचित्र झोतांमुळे तयार झाल्या आहेत. दोन्ही बाजूंनी आलेल्या वाऱ्यामुळे हे असे आश्चर्यकारक चित्र पाहायला मिळाले. 

4/10

तंत्रज्ञानाचा वापर करुन एखाद्या चित्रपटासाठी तयार केलेले हे दृष्य वाटते. पण, प्रत्यक्षात मात्र हे अमेरिकेतील आयोवा राज्यातील दृष्य आहे. एका वादळावेळी ढगांनी आकाशात अशी रचना केली होती. 

5/10

ऐकायला खोटं वाटेल, पण एक बौद्ध सन्यासी दररोज याच जागी येऊन प्रार्थना करत असे. थोडेथोडके नव्हे तर तब्बल २० वर्ष तो दररोज एकाच जागी उभा राहून प्रार्थना करत असे. त्याच्या या सवयीमुळेच या लाकडी फरशीवर त्याच्या पायांचे ठसे उमटले. 

6/10

स्टॉकहोम शहरात अशा प्रकारची अनेक मेट्रो स्टेशन्स ९० च्या दशकात बांधली गेली होती. लोकांना या स्टेशनची कायम आठवण रहावी यामुळे अशा प्रकारची कलाकुसर करुन ही स्टेशन्स तयार करण्यात आली होती. 'हेल एलीव्हेटर' अशी या सरकत्या जिन्यांची थीम आहे. 

7/10

मक्याची ही कणसं कोणतेही मणी किंवा दगड वापरुन तयार केलेली नाहीत. तर मक्याच्या अनेक प्रजातींच्या हायब्रीडमुळे या मक्याच्या कणसांना हा रंग प्राप्त झाला आहे. 

8/10

ही कोणतीही फिल्मसिटी नाही. तर हे आहे दक्षिण कोरियातील एक खरेखुरे हॉटेल. 'सन क्रूझ रिसॉर्ट' असे या हॉटेलचे नाव आहे. याच्या भव्यतेची एक झलक पाहण्यासाठी शेकडो पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. 

9/10

फोटोशॉपचा वापर केल्याचं वाटत असलं तरी हे मांजर अगदी खरं आहे. या मांजराच्या शरीरात दोन प्रकारचे डीएनए अस्तित्वात असल्याने हे मांजर असे दिसत आहे. याचे नाव व्हिनस असून त्याचा जन्म २००९ मध्ये झाला होता. 

10/10

पहिल्यांदा पाहिल्यावर हा फोटो तुम्हाला खोटा वाटेल. पण, कलाकार बर्डनॉट शिमल्डे यांनी एका खोलीतील तापमान, बाष्प आणि इतर काही घटकांचा अभ्यास करुन हा खराखुरा ढग तयार केला आहे. त्यांनी हे नक्की कसं साध्य केलं याविषयी मात्र कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. 