Darsh Amavasya 2024 : कार्तिक किंवा दर्श अमावस्या नेमकी कधी आहे, 30 नोव्हेंबर की 1 डिसेंबर? या तिथीला करतात पितृदोषासाठी उपाय

Kartik Amavasya 2024 Date In Marathi : पितृदोषापासून मुक्तीसाठी ओळखली जाणारी दर्श अमावस्याबद्दल भक्तांच्या मनात संभ्रम आहे. 30 नोव्हेंबर की 1 डिसेंबर नेमकी कधी आहे अमावस्या जाणून घ्या योग्य तारीख. 

नेहा चौधरी | Updated: Nov 27, 2024, 06:31 PM IST
Darsh Amavasya 2024 : कार्तिक किंवा दर्श अमावस्या नेमकी कधी आहे, 30 नोव्हेंबर की 1 डिसेंबर? या तिथीला करतात पितृदोषासाठी उपाय title=

Kartik Amavasya 2024 Date In Marathi : हिंदू धर्मात पौर्णिमा तिथी आणि अमावस्या तिथीला अतिशय महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथीबद्दल भक्तांच्या मनात संभ्रम आहे. अमावस्या तिथी ही 30 नोव्हेंबर सुरु होत असून 1 डिसेंबरला समाप्त होणार आहे. अशा स्थिती अमावस्या तिथी कधी पाळायची याची योग्य तारीख या लेखात सांगण्यात येणार आहे. त्यासोबत कार्तिक महिन्यातील अमावस्याला दर्श अमावस्या असंही म्हटलं जातं.या अमावस्येचा शुभमुहूर्त, पूजा-पद्धत, उपाय आणि महत्त्व जाणून घ्या. (Darsh Amavasya or Kartik Amavasya When is it exactly November 30 or December 1 date time shubh muhurta puja vidhi)

दर्श अमावस्या कधी आहे ?

हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी शनिवारी 30 नोव्हेंबरला सकाळी 10.29 मिनिटांपासून 1 डिसेंबरला सकाळी 11.50 मिनिटांपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार दर्श अमावस्या ही रविवारी 1 डिसेंबरला पाळायची आहे. 

अमावस्या 2024 शुभ मुहूर्त

दर्श अमावस्येच्या दिवशी ब्रह्म मुहूर्ताची वेळ पहाटे 5.08 ते सकाळी 6.02 पर्यंत असेल. या दिवशी अभिजीत मुहूर्त सकाळी 11:49 वाजता सुरू होईल आणि दुपारी 12:31 वाजेपर्यंत असणार आहे. 1 डिसेंबर रोजी राहुकाल दुपारी 4:05 ते 5:24 पर्यंत राहणार आहे. 

अमावस्या 2024 स्नान दान मुहूर्त

या दिवशी तुम्ही ब्रह्म मुहूर्तापासून स्नान आणि दान सुरू करू शकता. याशिवाय अमावस्येच्या दिवशी सुकर्म योगात स्नान, दान आणि पूजा करणे देखील शुभ असणार आहे. 

अमावस्येला या मंत्राचा करा जप 

ऊँ श्री कृष्णाय नम:

ऊँ श्री श्रीरघुनाथाय नम:

ऊँ श्री दामोदराय नम:

ऊँ श्रीजनार्दनाय नम:

अमावस्येला पित्रांच्या शांतीसाठी करा 'हे' काम

अमावस्येच्या दिवशी पितरांचे ध्यान करताना पिंपळाच्या झाडाला गंगाजल, काळे तीळ, साखर, तांदूळ, पाणी आणि फुले अर्पण करा आणि 'ॐ पितृभ्यै नमः' या मंत्राचा जप करा. या दिवशी पितृसूक्त आणि पितृस्तोत्राचे पठण केल्यास शुभ फल प्राप्त होते.

अमावस्येच्या रात्री हे उपाय करा

दर्श अमावस्येच्या रात्री पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा.
अमावस्येला संध्याकाळी तुपाचा दिवा लावून नदीत किंवा तलावात तरंगवावा. यामुळे पितरांना शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
रात्री शिवलिंगाला जल अर्पण करून आणि बेलपत्र अर्पण करून शंकराची पूजा करावी. त्यामुळे लोकांवर भोलेनाथांचा विशेष आशीर्वादांचा वर्षाव होतो.
अमावस्येच्या रात्री लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्तीची शक्यता निर्माण होते आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
श्रीगणेशाची आराधना केल्याने सर्व कार्यात यश मिळते आणि बिघडलेली कामेही पूर्ण होऊ लागतात. त्याच वेळी सर्व समस्या दूर होऊ लागतात.
अमावस्येच्या दिवशी दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्न, कपडे इत्यादी दान करू शकता.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)