Lakshmi Narayan Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर आपली रास बदलतो. म्हणजे तो एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतो. ज्योतिषशास्त्रानुसार, सुख आणि संपत्तीचा कारक शुक्र 12 फेब्रुवारी 2024 ला पहाटे 4.41 वाजता मकर राशीत गोचर करणार आहे. मकर राशीत बुद्धीचा दाता बुध आधीपासून विराजमान आहे. अशा स्थितीत मकर राशीतील दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. फेब्रुवारी महिन्यात बुद्धीचा दाता, ग्रहांचा राजकुमार बुध आणि संपत्तीचा कारक शुक्र यांची मकर राशीत संयोग होत आहे. (Lakshmi Narayan Rajyoga due to Mercury Venus in February These zodiac signs will get immense wealth)
या राशीमध्ये दशम भावात लक्ष्मी नारायण योग निर्माण होणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्हाला गवसणार आहे. व्यवसायाशी निगडित लोक प्रचंड यश प्राप्त करणार आहे. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ असणार आहे. शुक्राच्या प्रभावामुळे नातेसंबंध अधिक घट्ट होणार आहे. यासोबतच जीवनात सकारात्मक प्रभाव पडणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग खूप फायदेशीर ठरणार आहे. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल वाढणार आहे. शुक्र आणि बुध तुमच्या जीवनात सकारात्मक प्रभाव टाकणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरणार आहे. यासोबतच तुम्हाला संभाव्य आर्थिक लाभही मिळणार आहे. यामुळे काम करणा-या लोकांना प्रचंड यशासह बढती मिळणार आहे. वरिष्ठही तुमच्या कामावर खूश असणार आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या पगारात वाढीसोबत काही मोठी जबाबदारी मिळणार आहे. यासोबतच कौटुंबिक जीवनही चांगले असणार आहे.
चढत्या अवस्थेत लक्ष्मी नारायण योग तयार होत असल्याने या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. शुक्र सोबत बुध ग्रहाचा या राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. करिअरमध्ये सकारात्मक परिणाम दिसणार आहे. करिअरमध्ये वाढीसोबत प्रगती आणि समृद्धी मिळणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. तुमचं समर्पण आणि परिश्रम पाहून उच्च अधिकारी तुमची बढती करणार आहेत. व्यवसायाच्या क्षेत्राबद्दल बोलल्यास तुमची प्रगती होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)