मुंबई : प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या आयुष्यात खूप समृद्धी सुख आणि समाधान असावं. पण त्यासाठी नेमकं काय करायचं आणि काय करू नये हे आपण समजून घेत नाही. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा तुम्ही 7 कामं केली तर तुम्हाला श्रीमंत होण्याशिवाय कोणीच रोखू शकत नाही. फक्त ही 7 कामं मनापासून करायला हवीत.
सकाळी उठल्यानंतर दोन्ही हात जोडा आणि नमस्कार करा. दिवसाची सुरुवात आपल्या हातांच्या दर्शनाने करा. सकाळी उठवल्यावर देवाचं नाव घ्या. त्यामुळे दिवसाची सुरुवात प्रसन्न होईल. 'कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती। करमूले स्थितो ब्रह्मा प्रभाते करदर्शनम्।। हा श्लोक हात जोडून म्हणा.
उठवल्यानंतर धरणीमातेच्या अंगावर पाय ठेवतो. त्यामुळे या धारणी मातेचा आशीर्वाद घ्यायला हवा. त्यानंतर सूर्याला नमन करा. स्नान करा आणि सूर्य देवाला तांब्याच्या कलशातून जल अर्पण करा.
सूर्याची उपासना केल्याने नोकरी-व्यवसायामध्ये सन्मान मिळतो. आर्थिक वृद्धी होते. नियमित सूर्यदेवाची उपासना फायद्याची ठरते. कामात यश मिळतं. सूर्य देवाच्या उपासनेमुळे प्रत्येक कामात यश मिळतं.
शास्त्रांनुसार तुळशीला खूप महत्त्व आहे. तुळस म्हणजे लक्ष्मी मानलं जातं. नियमित या तुळशीची पूजा करावी. जे काम कराल त्यामध्ये अडथळे दूर करण्यासाठी मनोभावे तिची पूजा करा. तुळशीची माती थोडी कपाळाला लावा. त्याचा फायदा होतो. सकारात्मक ऊर्जा मिळते.
शंकराला अभिषेक करा. शिवलिंगावर जलाभिषेक करण्याने मोठा फायदा होते. शिवलिंगावर दुग्धाभिषेकही करू शकता. शंकराच्या दर्शनाने मोठा फायदा होतो. यामुळे आयुष्यात सुख समृद्धी राहाते.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)