Bhogi 2023 Importance and significance : (New year ) इंग्रजी नववर्षाची सुरुवात झाल्यानंतर जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच एका सणाची चाहूल लागते. (Winter Wave) बोचरी थंडी आणि या सणाची चाहूल या दोन्ही गोष्टी नाही म्हटलं तरी एकत्रच येतात आणि मग तयारी सुरु होते, मकर संक्रांतीच्या तयारीची. (Tilgul) 'तिळगूळ घ्या, गोड बोला; आमचा तीळ सांडू नका आमच्याशी कधी भांडू नका', हे असं म्हणत संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या जातात. यावेळी तिळाचे लाडू आणि साखरफुटाणे वाटून या सणाचा आनंद घेतला जातो. (Sugad Pujan) सुगडांची पूजा होते आणि महिला वर्गासाठी महत्त्वाच्या अशा हळदीकुंकू समारंभाचंही आयोजन केलं जातं. संक्रांतीच्या एक दिवस आधी (आज) भोगी असते. या दिवसाचंही तितकंच महत्त्वं (Bhogi importance).
(Bhogichi bhaji) मिश्र धान्यांची भाकरी, भोगीची भाजी असा बेत या दिवशी केला जातो. अंघोळीच्या पाण्यात तीळ घालण्यापासून केस धुण्यापर्यंत अनेक गोष्टींचं पालन केलं जातं. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, की भोगी नेमकी का साजरी केली जाते?
आतापर्यंत तुम्ही किमान एकदातरी 'न नाही भोगी, तो सदा रोगी' हे वाक्य ऐकलं असेल. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला, म्हणजेच भोगीच्या दिवसाला संबोधून हे वाक्य वापरलं जातं. मानवी नात्यांमध्ये असणारा ओलावा कायम राहावा आणि नाती आणखी दृढ व्हावी हा या दिवसामागचा संदेश असतो.
असं म्हणतात की भोगीच्या दिवशी भगवान इंद्राला आळवलं जातं, त्यांना स्मरूनच पूजा केली जाते. इंद्रानंच पृथ्वीवर अमाप पिक पिकावीत अशी प्रार्थना केली होती. हीच पिकं आजपर्यंत अनेकांचीच भूक भागवत आली, अनेकांना समृद्ध करत आली. हेच चक्र अविरतपणे चालत रहावं या हेतूनं प्रार्थना करत आजचा दिवस त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो. या दिवशी केस धुवून शरीरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट करण्याचा संदेश दिला जातो. तसंच विविध रोगांपासून मुक्तता मिळण्यासाठी प्रार्थनाही केली जाते.
भोगी अनेक राज्यांमध्ये विविध पद्धतींनी साजरी केली जाते. एकट्या महाराष्ट्रातच भोगीच्या दिवसाची अनेक रुपं पाहायला मिळतात. कोकण, मराठवाडा, विदर्भ, कोकण या सर्व भागांमध्ये भोगी मोठ्या उत्साहात आणि त्या त्या ठिकाणची चव असणारी खास भोगीची भाजी करून साजरा केली जाते. ही भाजी आणि तिळमिश्रीत भाकरी खाल्ल्यामुळं ऐन थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला अपेक्षित ऊबही मिळते. थोडक्यात या सणाच्या निमित्तानं आरोग्याची काळजी घेण्याचीही संधी सर्वांनाच मिळते.