Mangal Dosh : लग्न जमत नाही? मग कुंडलीत असू शकतो मंगळ दोष, लगचेच करा 'हे' उपाय

Kundali Mangal Dosh  :  घरता सतत वादावादी होणे, लग्न जमत नाही..जमलं तर मोडतं, कुठल्याही कार्यात यश येतं नाही. अशात तुमच्या कुंडलीत मंगळ दोष तर नाही लगेचच पाहा. कारण मंगळ दोष असेल तर तुमचं आयुष्य नरक होतं, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. जर तुमच्या कुंडलीत 

Updated: Jan 27, 2023, 07:55 AM IST
Mangal Dosh : लग्न जमत नाही? मग कुंडलीत असू शकतो मंगळ दोष, लगचेच करा 'हे' उपाय title=
mangal dosh door upay Cant get married how to remove mangal dosha in horoscope aishwarya rai bachchan had manglik dosh marathi news

Remedies for Mangal Dosh :  स्वभाव जमतो, नोकरी चांगली, कुटुंबातील सगळं चांगलं तरीही लग्न जमण्यात अडथळा येतो. याचा अर्थ तुमच्या कुंडलीत मंगळ दोष (What is Mangal Dosha) असू शकतो. मंगळ दोष असल्यास आयुष्यात काही चांगलं होतं नाही, असं ज्योतिषशास्त्रात सांगतात. त्यामुळे या दोषाचा कहर थांबविण्यासाठी शास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीच्या पहिल्या, चौथ्या, सातव्या, आठव्या आणि बाराव्या घरात मंगळ असतो तेव्हा अशा लोकांना मांगलिक म्हणतात. असं म्हणतात मांगलिक लोकांचं लग्न जमण्यास अनेक अडथळे येतात. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (aishwarya rai bachchan had manglik dosh), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) याची सून हीदेखील मांगलिक होती असं म्हणतात. अभिषेक बच्चनसोबत लग्न करण्यापूर्वी ऐश्वर्याचं लग्न पिंपळाच्या झाडासोबत केल्याचं एका वृत्तानुसार बोलं जातं. तुमच्याही कुंडलीत मंगळ दोष आहे याचे काही संकेत मिळतात, शिवाय त्यावर मात करण्यासाठी शास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. (mangal dosh door upay Cant get married how to remove mangal dosha in horoscope  aishwarya rai bachchan had manglik dosh marathi news)

मांगलिक दोष असल्याचे संकेत (Mangal Dosh Prabhav)

रागिष्ट स्वभाव

जर एखाद्या व्यक्ती सतत रागवत असेल. कुठल्याही मुद्द्यावर त्याला राग येतं असेल. तर त्याचा कुंडलीत मंगळ दोष असू शकतो. त्याचा या रागामुळे होणारे कामही बिघडतं म्हणजे त्याने कुंडलीतील दोष बघायला पाहिजे. 

कामुकता

ज्या लोकांच्या कुंडलीत मंगल दोष असतो ते लैंगिकतेचे शिकार असतात, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. ही कामुकता त्यांना कधीकधी खूप मोठ्या संकटातही टाकू शकते, ज्यामुळे त्यांना खूप नुकसान सहन करावे लागतं. 

लग्न जमण्यास अडथळा

ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळ दोष असतो, त्यांच्या लग्नात अनेक अडथळे येतात. शिवाय अनेक वर्षांच्या परिश्रमानंतर विवाह झाला तरी पती-पत्नीमध्ये वाद होतात. अनेक वेळा हे प्रकरण लग्न मोडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचते. अशावेळी त्या व्यक्तीमध्ये मंगळ दोष असू शकतो. 

मांगलिक दोष दूर करण्यासाठी 5 उपाय (Manglik Dosh Upay)

आपण संकेत काय आहेत ते जाणून घेतले. आता त्यावर ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत ते केल्यास तुम्हाला मदत होईल. 

1. कुंडलीतील मंगल दोष दूर करण्यासाठी व्यक्तीने लाल फुलाचं वस्त्र, चंदन, मसूर, गहू, केशर, भुई किंवा कस्तुरी यांचं दान करावं. 

2.  प्रत्येक मंगळवारी हनुमान चालिसाचं पठण करावं.

3. मंगल दोष दूर करण्यासाठी मूंगा म्हणजेच मंगलरत्न धारण करावे. 

4. आपल्या घरात मंगल यंत्राची स्थापना करावी आणि रोज त्याची पूजा करावी. 

5. पाण्यात थोडी कुमकुम पावडर किंवा लाल चंदन मिसळून आंघोळ करावी. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)