ODI World Cup 2023: येत्या 5 ऑक्टोबरपासून आयसीसी वनडे वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. यंदाचा वर्ल्डकप भारतात आयोजित केला गेला असून चाहते यासाठी उत्सुक आहेत. टीम इंडिया हा वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानली जातेय. मात्र अशातच टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने संघाटी साथ सोडली आहेत.
टीम इंडिया 3 ऑक्टोबर रोजी नेदरलँड्स विरूद्ध सामना खेळायचा आहे. हा सामना तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर रंगणार आहे. पण या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीबाबत एक मोठी अपडेट समोर आलीये आहे. एका वैयक्तिक कारणामुळे तो टीम इंडिया सोडून मुंबईत परतला.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, विराट कोहली टीम मॅनेजमेंटची परवानगी घेतल्यानंतर गुवाहाटीहून मुंबईला गेला. टीम इंडिया रविवारी संध्याकाळी गुवाहाटीहून तिरुअनंतपुरमला चार तासांच्या स्पेशल फ्लाइटने पोहोचली. यावेळी वैयक्तिक कारणामुळे कोहलीने भारतीय टीम मॅनेजकडून सुटी घेतली आहे.
टीम इंडियाने अजूनही एकही प्रॅक्टिस सामना खेळलेला नाही. कारण इंग्लंडविरुद्धचा सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला. Weathercom नुसार, मंगळवारी तिरुवनंतपुरममध्ये कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. संपूर्ण सामन्यादरम्यान पावसाची 90% शक्यता आहे. त्याचप्रमाणे ढगाळ वातावरण असण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे नेदरलँड्सविरूद्धच्या सामन्यात देखील पावसाची शक्यता आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन आणि शार्दुल ठाकूर