ऑक्शनमध्ये unsold पण तरीही 'हे' खेळाडू IPL 2025 मध्ये खेळू शकतात, कसे? जाणून घ्या

IPL 2025: आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात 182 खेळाडूंना खरेदी करण्यात आले, तर 395 खेळाडू विकले गेले नाहीत. पण या न विकल्या गेलेल्या खेळाडूंना आयपीएल 2025 मध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. कसं ते जाणून घेऊयात.   

तेजश्री गायकवाड | Updated: Dec 4, 2024, 08:35 AM IST
ऑक्शनमध्ये unsold पण तरीही 'हे' खेळाडू IPL 2025 मध्ये खेळू शकतात, कसे? जाणून घ्या  title=

How Can Unsold Players Play in IPL 2025: आयपीएल 2025 मेगा लिलाव सौदी अरेबियामधील जेद्दाह शहरात  24 आणि 25 नोव्हेंबर रोजी झाला. या मेगा लिलावात एकूण 182 खेळाडूंना खरेदी करण्यात आले होते. तर 395 खेळाडू विकले गेले नाहीत. खरेदी केल्या गेलेल्या या खेळाडूंसाठी 639.15 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. 182 खेळाडूंमध्ये 62 परदेशी खेळाडू होते आणि 8 खेळाडूंसाठी राईट टू मॅच कार्डचा वापर करण्यात आला. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर सारख्या खेळाडूंना आयपीएल मेगा लिलाव 2025 मध्ये मोठी रक्कम मिळाली. पण पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर आणि शार्दुल ठाकूर यांसारख्या प्रसिद्ध खेळाडूंना कोणी विकत घेतले नाही. पण तरीही हे खेळाडू आयपीएल 2025 मध्ये खेळू शकतात. कसे? हे जाणून घेऊयात. 

कशी मिळू शकते संधी? 

लिलावात न विकलेले खेळाडू IPL 2025 मध्ये खेळू शकतात. त्यांना ही संधी एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यास मिळू शकते. फ्रेंचायझी त्या खेळाडूला पूलमधील न विकलेल्या खेळाडूंपैकी एकासह बदलू शकते. याला इजा रिप्लेसमेंट म्हणतात.

हे ही वाचा: अवघ्या 22 व्या वर्षी निवृत्ती, 70000 कोटींहून अधिक संपत्ती; सचिन-धोनी नाही तर 'हा' आहे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू

नक्की नियम काय आहेत?

  • दुखापत बदलण्याचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे बदली खेळाडूची मूळ किंमत दुखापतग्रस्त खेळाडूच्या मूळ किमतीपेक्षा कमी असावी.
  • उदाहरणार्थ, पृथ्वी शॉची मूळ किंमत ७५ लाख रुपये आहे. अशा परिस्थितीत दुखापतग्रस्त खेळाडूची किंमत 75 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तेव्हाच त्याची निवड होऊ शकते.

हे ही वाचा: IND vs AUS: क्रिकेट विश्वात शोककळा...भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान 'या' महान फलंदाजाचे निधन

'या' खेळाडूंना मिळू शकते संधी 

पृथ्वी शॉ: पृथ्वी शॉला आयपीएल 2025 साठी दिल्ली कॅपिटल्सने रिटेन केले नाही. शिवाय आयपीएल 2025 च्या मेगा लिलावातही त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. तर त्याची मूळ किंमत फक्त 75 लाख रुपये होती. पृथ्वी शॉने 2018 ते 2024 पर्यंत 79 IPL सामने खेळले आहेत. 

डेव्हिड वॉर्नर: डेव्हिड वॉर्नरला आयपीएल 2025 साठी दिल्ली कॅपिटल्सने रिटेन केले नाही. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावातही त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. तर त्याची मूळ किंमत फक्त २ कोटी रुपये होती. डेव्हिड वॉर्नरने 2009 ते 2024 पर्यंत 184 आयपीएल सामने खेळले आहेत.

हे ही वाचा: "तर पाकिस्तानच्या संघाने भारतात जावे आणि..." चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादावरून शोएब अख्तरने टीम इंडियासाठी काढले वाईट उद्गार

शार्दुल ठाकूर: शार्दुल ठाकूरला चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2025 साठी रिटेन केले नाही. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावातही त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. तर त्याची मूळ किंमत फक्त २ कोटी रुपये होती. शार्दुल ठाकूरने 2015 ते 2024 पर्यंत 95 आयपीएल सामने खेळले आहेत.