IND vs JAP: चक दे इंडिया! सेमीफायनलमध्ये जपानला 5-0 ने लोळवत भारताची फायनलमध्ये एन्ट्री

Asian champions trophy hockey 2023: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने ( india beat japan by 5-0) जपानचा 5-0 असा पराभव केला. 

Updated: Aug 11, 2023, 11:32 PM IST
IND vs JAP: चक दे इंडिया! सेमीफायनलमध्ये जपानला 5-0 ने लोळवत भारताची फायनलमध्ये एन्ट्री title=
IND vs JAP Asian champions trophy hockey 2023, india hockey team

Japan vs India Hockey: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीच्या (Asian champions trophy hockey) उपांत्य फेरीत भारतीय संघाने जपानचा 5-0 असा पराभव केला. चेन्नईच्या महापौर राधाकृष्णन स्टेडियमवर दोन्ही संघ (IND vs JAP) आमनेसामने आले होते. या विजयासह भारताने अंतिम फेरीतील आपलं स्थान पक्कं केलंय. आता 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या विजेतेपदाच्या लढतीत भारतीय संघ मलेशियाशी (Asian champions trophy hockey Final) खेळणार आहे. मलेशियाने पहिल्या उपांत्य फेरीत गतविजेत्या दक्षिण कोरियाचा 6-2 असा पराभव केला. तर भारताने जपानचा 5-0 असा पराभव केलाय. त्यामुळे आता फायनलमध्ये कोण वरचढ ठरणार हे पहावं लागेल.

भारताकडून सामन्यातील पहिला गोल आकाशदीपने केला. 19व्या मिनिटाला हार्दिकच्या पासवर त्याने शानदारपणे चेंडू गोलपोस्टमध्ये टाकला. कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत 2-0 ने आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरअखेर भारताने 3-0 अशी आघाडी घेतली होती. आता सामना भारताच्या बाजूला झुकला गेला. टीम इंडियासाठी मनदीप सिंगने तिसरा गोल केला.

आणखी वाचा - IND vs JAP: चक दे इंडिया! सेमीफायनलमध्ये जपानला 5-0 ने लोळवत भारताची फायनलमध्ये एन्ट्री

भारतासाठी सुमितने चौथा गोल केला. सामन्यातील चौथा गोल तिसऱ्या क्वार्टरमध्ये झाल्याने टीम इंडिया विजयाच्या उंभरठ्यावर पोहोचली होती. तिसऱ्या क्वार्टरनंतर भारतीय संघ सामन्यात 4-0 ने आघाडीवर होता. चौथ्या क्वार्टरमध्ये जपान कमबॅक करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, टीम इंडियाने गेम चेंज केला. पाचव्या क्वार्टरमध्ये आक्रमक सुरू केलं. त्यामुळे जपानला एकही संधी मिळाली नाही. त्यानंतर 51 व्या मिनिटाला भारताने पाचवा गोल करत सामना खिश्यात घातलाय.

भारतीय संघ 5 वर्षांनंतर आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. 2018 साली टीम इंडियाने अशी कामगिरी केली होती. त्याचबरोबर 2011 आणि 2016 मध्येही संघ चॅम्पियन ठरला. भारत पाचव्यांदा फायनल खेळणार आहे. 2012 मध्ये भारतीय संघ केवळ विजेतेपदाच्या सामन्यात पराभूत झाला होता. त्यानंतर आजपर्यंत भारतीय हॉकी संघाने पराभव पाहिला नाही. त्यामुळे आता फायनल सामन्यात मलेशियाचा नांग्या ठेचण्यासाठी टीम इंडिया उत्सुक असेल.