Rinku Singh Bittern By Monkey: साप बदला घेतो, तो तुमच्या घरापर्यंत येऊन तुम्हाला चावतो, असे तुम्ही सिनेमात पाहिलं असेल. अशा अनेक घटनांमुळे आपल्याला सापाबद्दल भीती निर्माण होते. त्यात आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या काही घटना आणखी भर घालतात. काही दिवसांपुर्वीच उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमधील विकास दुबे नावाच्या तरुणाने असाच एक दावा केला होता. 40 दिवसांच्या आत आपल्याला 7 वेळा साप चावल्याचे त्याचे म्हणणे होते. आता माझा मृत्यू जवळ आलाय, असेही 24 वर्षाचा विकास सांगायचा.
सापापासून बचाव व्हावा म्हणून त्याला दूर जाऊन राहण्याचा सल्ला दिला होता. यानंतर तो मावशी आणि काकांच्या राहयला गेला. पण साप तिथे येऊन आपल्याला चावल्याचे विकासने सांगितले. याकाळात विकासच्या तब्येतीवर परिणाम होत असल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्याच्यावर उपचार करुन त्याला डिस्चार्ज देण्यात आला. माझ्या स्वप्नात येऊन तूला 9 वेळा चावणार असे सापाने म्हटल्याचा दावा विकासने केला होता. साप बदला घेतो वैगेरे ही अंधश्रद्धा असल्याचे म्हटले जाते.केवळ सिनेमामध्ये असे प्रकार दाखवले जातात, त्यातून माणसांची अशी समज होते, असे तज्ञ सांगतात. सापाचं प्रकरण देशभरात चर्चेत असताना आता एका माकडाचं प्रकरण चर्चेत आलंय. एक माकड आपल्याला वारंवार चावल्याचा दावा करण्यात आलाय. हा दावा करणारा दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या टीम इंडियाचा क्रिकेट रिंकू सिंह आहे. रिंकू सिंहला एक माकड वारंवार येऊन चावलं होतं.
रिंकू सिंह आपल्या धडाकेबाज खेळीसाठी ओळखला जातो. दरम्यान त्याची एक जुनी मुलाखत व्हायरल होतेय. त्यामध्ये त्याने आपल्याला माकड चावल्याचा खुलासा केला होता. आयपीएल 2024 नंतर कोलकाता नाईट रायडर्सला मुलाखत देताना रिंकूने या घटनेची आठवण केली होती. मुलाखतीवेळी रिंकू आपल्या उजव्या हातावरील टॅटू अॅंकरला दाखवतो. यानंतर दुसऱ्या हातावर काय आहे? असा प्रश्न अॅंकरने रिंकूला विचारला.
ही मुलाखत देताना रिंकूसोबत सहाय्यक कोच अभिषेक नायरदेखील उपस्थित होते.ते म्हणाले आता ती माकडाची कहाणीदेखील सांगून टाक असे ते रिंकूला सांगतात. तेव्हा रिंकू म्हणतो, मला 6 वेळा माकड चावलाय. त्याला (माकडाला) मी आवडलो, असे म्हणत रिंकू हसायला लागला. एकच माकड चावलं का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर हो. एकच माकड येऊन चावलं असे रिंकूने म्हटले.
विकास दुबे प्रकरणात उत्तर प्रदेशच्या सीएमओने चौकशीचे आदेश दिले आहेत. यासाठी डॉक्टरांची एक टीम बनवण्यात आली आहे. ते आपला रिपोर्ट डीएमना पाठवतील. 3 सदस्यांच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार विकास दुबेला केवळ एकदाच साप चावला होता.
समोर आलेल्या रिपोर्टनुसार, विकास दुबेला स्नेक फोबिया आहे. मानसिक रुग्ण विशेषज्ञांकडून त्याचा इलाज करुन घेण्याची गरज असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटलंय. यानंतर विकासच्या परिवाराशी चर्चा करुन मनसोपचारतज्ञांकडून त्याचा इलाज करुन घेण्यात येणार आहे.