मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात चेन्नईने (CSL) मुंबईचा (MI) पराभव केला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Shamra) या सामन्याला दुखापतीमुळे मुकावं लागलं. या सामन्यात चेन्नईने मुंबईचा 20 धावांनी पराभव केला. रोहितच्या अनुपस्थितीत कायरन पोलार्डने मुंबईच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली. सामन्यादरम्यान रोहित सामन्यात न खेळण्याचं कारण स्पष्ट झालं. रोहित चेन्नई विरुद्धच्या सामन्यात का खेळला नाही, याबाबतचा खुलासा मुंबईचा बॅटिंग कोच महिला जयवर्धनने केला. (ipl 2021 at uae mumbai indians batting coach gives mahila jaywardhane reaction on rohit sharma injurey)
जयवर्धने काय म्हणाला?
रोहितला खबरदारी म्हणून या चेन्नई विरुद्धच्या सामन्यात खेळवलं नसल्याचं जयवर्धनने स्पष्ट केलं. "रोहितला ओव्हल टेस्टमध्ये साधारण दुखापत झाली. त्यामुळे आम्ही खबरदारी म्हणून आणखी 2 दिवस म्हणून काळजी घेणार आहोत", असं जयवर्धने म्हणाला. मुंबईचा पुढचा सामना हा 23 सप्टेंबरला कोलकाता विरुद्ध होणार आहे.
रोहितला इंग्लंड दौऱ्यावर असताना गुडघ्याला दुखापत झाली हगोती. रोहितने इंग्लंड विरुद्ध चौथ्या ओव्हल कसोटीत दुसऱ्या डावात शतकी खेळी केली होती. मात्र यानंतर जेव्हा इंग्लंड बॅटिंगसाठी आली, तेव्हा रोहित फिल्डिंगसाठी मैदानात उपस्थित नव्हता.
रोहित काय म्हणाला होता?
"प्रत्येक मिनिटाचे आकलन करा, खूप दूर पाहू नका", असा संदेश फिजीओने दिल्याचं रोहित म्हणाला होता. रोहितने ओव्हल कसोटीनंतर ही प्रतिक्रिया दिली होती. रोहितला दुखापत होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी रोहितला आयपीएलच्या 13 व्या मोसमातही दुखापत झाली होती.
दरम्यान मुंबईने या 14 व्या हंगामात आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. यापैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर तितक्याच सामन्यात मुंबईवर प्रतिस्पर्धी संघानी मात केली आहे. त्यामुळे आता रोहित दुखापतीतून सावरुन मैदानात खेळताना कधी दिसतोय, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.