IPL Mini Auction 2023 Date: इंडियन प्रीमीयर लीगचे (IPL) आत्तापर्यंत 15 हंगाम पूर्ण झाले असून आता पुढीलवर्षी 16वा आयपीएल हंगाम खेळवला जाणार आहे. पण त्याआधी उद्या (2 डिसेंबर) आयपीएलच्या या नव्या हंगामासाठी खेळाडूंचा छोटा लिलाव पार पडणार आहे. यामध्ये 87 स्लॉटसाठी 405 खेळाडू आपले नशीब आजमावतील. 10 संघांमधून सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडण्याची लढाई होणार आहे. बेन स्टोक्स, सॅम कुरन, कॅमेरॉन ग्रीन, केन विल्यमसन आणि जो रूट यासारखे अनेक हाय-प्रोफाइल खेळाडू या वर्षी खेळाडूंच्या पूलमध्ये आहेत. तसेच हा लिलाव कोचीमधील फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडणार आहे. या लिलावाला 23 डिसेंबरला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरुवात होणार आहे. तसेच हा लिलाव साधारण 7 तास चालण्याची शक्यता आहे.
आयपीएल मिनी लिलावामुळे संघांना त्यांच्या संघात काही नवीन चेहरे जोडण्याची संधी मिळते. टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघातील अनेक स्टार खेळाडूंवर बाजी मारण्याची शक्यता आहे. यामध्ये हॅरी ब्रूकसारख्या युवा स्टार्सचा समावेश आहे. लिलावादरम्यान संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होण्याची शक्यता आहे.
वाचा : IPL Auction 2023 : आज आयपीएल 2023 चा लिलाव, कोण होणार मालामाल? सर्व अपडेट एका क्लिकवर
सनरायझर्स हैदराबाद 42.25 कोटी रुपयांच्या सर्वात मोठ्या पर्ससह मिनी-लिलावात प्रवेश करेल. तर पंजाब किंग्ज 32.2 कोटी आणि लखनऊ सुपरजायंट्स 23.35 कोटी रुपयांवर आहेत. पर्सच्या बाबतीत हे दोघे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सकडे फक्त 7.05 कोटी रुपये आहेत. तर रॉयल चॅलेंजर्सकडे 8.75 कोटी रुपये आहेत.
IPL 2023 चा मिनी लिलाव 23 डिसेंबर रोजी (उद्या)
आयपीएल 2023 चा मिनी लिलाव कोची येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये होणार आहे.
IPL 2023 चा मिनी लिलाव भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू होईल.
IPL 2023 मिनी-लिलाव स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर थेट प्रसारित केला जाईल.
स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवर, Jio Cinema अॅप आणि वेबसाइटवर लाइव्ह-स्ट्रीम पाहू शकता.