Mumbai Indians vs Royal Challengers Bangalor : संपूर्ण क्रिडा विश्वाचं लक्ष लागलेल्या इंडियन प्रिमियर लीग (IPL 2023) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पण या स्पर्धेतील सामन्यांना ग्रहण लागलं की काय असं दिसतंय. कारण शनिवारी दुसऱ्या सामना रद्द होता होता पार पडला. तर आज रविवारी मुंबई इंडियन्स आणि RCB यांच्यामधील (RCB vs MI) सामन्यावरही रद्द होण्याचे ढग घोंघावत आहे. त्यामुळे आयपीएल प्रेमींमध्ये नाराजी आहे.
आज रविवार () असल्याने इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) दोन सामने रंगणार आहेत. दुपारी 3.30 वाजता (Sunrisers Hyderabad) सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि (Rajasthan Royals) राजस्थान रॉयल्स (RR) हे एकमेकांशी (RR vs SRH) लढणार आहेत. तर संध्याकाळी 7.30 वाजता (Mumbai Indians) मुंबई इंडियन्स आणि (Royal Challengers Bangalore) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB vs MI) आमनेसामने येणार आहेत. हे दोन्ही सामने बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहेत. त्यापूर्वी हवामान संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. (IPL 2023 rcb vs mi Mumbai Indians Royal Challengers Bangalorem chinnaswamy stadium match might cancelled due to weather Rohit Sharma Virat Kohli)
मुंबईकरांसाठी आज आयपीएलमधील पहिलाच सामना असल्याने ते उत्सुक आहेत. अशातच या सामन्यापूर्वी बेंगळुरुमधील हवामानाची माहिती समोर आली आहे. हवामान खात्यानुसार, आज बंगळुरूचे तापमान 20 ते 33 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर सामन्यावेळी पावसाची शक्यता नसल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.
त्यामुळे आयपीएल चाहत्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना या दोन संघांमधील धमाकेदार सामना पाहता येणार आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 30 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 13 आणि मुंबईने 17 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, गेल्या 5 सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी काही विशेष राहिली नाही. या 5 सामन्यांपैकी त्यांना फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे आजच्या सामन्याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
डू प्लेसिस (कर्णधार), फिन ऍलन, विराट कोहली, महिपाल लोमरोर, माइक ब्रेसवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, हर्षल पटेल, करण शर्मा, रीस टोपली, मोहम्मद सिराज.
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, कॅमेरॉन ग्रीन, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय, अर्शद खान, जेसन बेहनडॉर्फ.
हे दोन्ही सामने तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर आणि लाइव्ह स्ट्रीमिंग 'Jio Cinema' अॅपवर पाहू शकणार आहात.