Kavya Maran Viral Video : सध्या प्लेऑफसाठी (IPL Playoffs) रंगतदार लढत होत असल्याचं पहायला मिळतंय. तीन संघांनी प्लेऑफमचं तिकीट निश्चित केलं असताना आता एका जागेसाठी तीन संघाच फाईट होत आहे. कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद या तिन्ही संघांनी प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. काल गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (GT vs SRH) यांच्यातील सामना पावसामुळे धुवून गेला. त्यामुळे दोन्ही संघांना एक एक गुण मिळाले. खात्यात एक गुण जमा होताच सनरायझर्स हैदराबादने प्लेऑफमध्ये (Sunrisers Hyderabad) नाव नोंदवलंय. सामना रद्द झाल्यानंतर हैदराबादची मालकीण काव्या मारनचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सामना सुरू होण्याची नियोजित वेळ संध्याकाळी 7.30 होती, मात्र अखेर पंचांनी रात्री 10:10 वाजता सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. सामना रद्द होताच खेळाडूंनी शेक हँड्स केलं. त्यावेळी सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारनने माजी कर्णधार केन विल्यमसनला मिठी (Kavya Maran Hugs Kane Williamson) मारली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संघाने प्लेऑफ गाठल्यानंतर काव्या मारनच्या चेहऱ्यावर हसू फुलल्याचं दिसून आलंय.
पाहा Video
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 16, 2024
केन विल्यमसन सध्या गुजरात टायटन्स संघात आहे. केन विल्यमसन 2015 ते 2022 पर्यंत सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाचा भाग होता. केन विल्यमसनने सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाचे नेतृत्वही केलं आहे. मागील हंगामात तो गुजरात टायटन्सकडे होता. मात्र, बॉन्ड्रीवर कॅच घेताना झालेल्या दुखापतीनंतर तो आयपीएल हंगामातून बाहेर पडला. त्यानंतर यंदाच्या हंगामात त्याला संधी मिळाली नव्हती.
हैदराबाद टॉप 2 मध्ये कसं पोहोचेल?
सध्या सनरायझर्सचे 13 सामन्यांत 15 गुण झालं असून हैदराबाद संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. प्लेऑफमध्ये टॉप 4 संघ खेळतील. त्यातील पहिल्या दोन संघांना फायनलचं तिकीट गाठण्यासाठी फक्त एक विजायाची गरज आहे. क्वालिफायर-1 मध्ये जो संघ जिंकेल तो संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल तर पराभूत झालेला संघ क्वालिफायर-2 खेळेल. त्यामुळे जर हैदराबादला टॉप-2 मध्ये जायचं असेल तर हैदराबादला पंजाबला हरवावं लागेल तर दुसरीकडे केकेआरला राजस्थान रॉयल्सला पराभूत करावं लागेल.