IPL 2024 MI vs RR Match Preview: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) मध्ये 14 वा सामना आज (1st Apri) मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना सायंकाळी 7.30 वाजता मुंबई आणि राजस्थानचा सामना सुरु होईल. या सामन्यात सुरुनातीच्या दोन्ही सामन्यात पराभूत झालेली मुंबईती टीम होम ग्राउंडवर राजस्थानला हरवून आयपीएल 2024 चा पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. तर राजस्थानची टीम आयपीएल 2024 मधील आपली विजयी घोडदौड सुरु ठेवण्यासाठी विजय मिळवण्याता प्रयत्न असेल. या दोन्ही संघांकडे स्टार खेळाडूंची फौज आहे. घरच्या मैदानावर तरी हार्दिकची टीम जिंकणार का?
घरच्या मैदानावर म्हणजे मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात मुंबई इंडियन्सची नजर पहिल्या विजयाकडे असेल. या मोसमात मुंबईला सध्या टूर्नामेंटमध्ये 2 सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामने गमावल्यानंतर ते पॉइंट टेबलच्या तळाशी आहेत. जर राजस्थान रॉयल्स 2 सामने खेळले असून दोन्ही सामने जिंकले आहेत. सध्या ते 4 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. यानंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबई संघ विजयाचे खाते उघडण्यात यशस्वी ठरणार का यावर सर्वांच्या नजरा आहेत.
आयपीएलच्या हेड टू हेड रेकॉर्डमध्ये मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्सपेक्षा किंचित पुढे आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत या दोन्ही संघांमध्ये 28 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये मुंबईने 15 वेळा विजय मिळवला आहे. तर राजस्थान रॉयल्सने 12 सामने जिंकले आहेत. तर एक सामना 2009 मध्ये रद्द करण्यात आला होता. मात्र 2018 पासून राजस्थानने मुंबईविरुद्ध 10 पैकी 6 सामने जिंकत आघाडीवर आहे. आयपीएल 2018 आणि 2019 मध्ये राजस्थान रॉयल्सने लीग टप्प्यात मुंबई विरुद्ध खेळलेले त्यांचे सर्व 4 सामने जिंकले. त्यामुळे मुंबईला राजस्थान विरुद्ध विजय मिळवून हॅटट्रिक करण्याची संधी आहे. त्यामुळे आता पलटणला पहिल्या विजयासह राजस्थान विरुद्ध विजयी हॅटट्रिक पूर्ण करण्याची सुवर्ण संधी आहे.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत वानखेडे मैदानावर 78 सामने खेळले आहेत. यामध्ये मुंबईने 48 सामने जिंकले आहेत तर 29 सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागलं. मुंबईने त्यांच्या घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना 23 सामने आणि लक्ष्याचा पाठलाग करताना 25 सामने जिंकले आहेत. तसेच या मैदानावरील सर्वात मोठी धावसंख्या मुंबई विरुद्ध पंजाब किंग्ज (2017) सामन्यात 223/6 (20) केली होती. तर सर्वात कमी धावसंख्या हैदराबाद विरुद्ध 87 सर्वबाद (18.5) अशी होती.