IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Pitch Report: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) मध्ये 14 वा सामना आज (1st Apri) मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना सायंकाळी 7.30 वाजता मुंबई आणि राजस्थानचा सामना सुरु होईल. आजचा सामना मुंबईतील वानखेडे मैदानार खेळवला जाणार असून वानखेडेवर फलंदाजीसाठी खेळपट्टी कशी असेल? हवामानाच अंदाज कसा असेल. तसेच हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानावर आजतरी मुंबई विजयाचे खाते उघडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबई इंडियन्सला यंदाच्या मोसमात खेळलेल्या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलं. तर दुसऱ्या बाजूला राजस्थान रॉयल्सने खेळलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला. अशातच मुंबईवर राजस्थान रोखण्यासह पहिला विजय मिळवण्याचे आव्हान असणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ या हंगामातील पहिला विजय मिळवण्यासाठी खेळेल. तसेच विजयासह मुंबईला नेट रनरेट देखील सुधारण्याची आवश्यकता आहे. कारण आयपीएलच्या 2024 च्या पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स तिसऱ्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्स तळाशी आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे. हे मैदानात फलंदाजीसाठी पोषक अशी खेळपट्टी असेल. या मैदानावर धावांवर नियंत्रण ठेवणे गोलंदाजांसाठी खूप अवघड काम असते. वेगवान आउटफिटमुळे चेंडु सीमारेषेच्या पलीकडे पाठवणे सोपे फलंदाजांसाठी राहते. वानखेडे मैदानावरील खेळपट्टी फलंदाजीसाठी अतिशय योग्य मानली जाते. यामुळे या मैदानावर अनेकदा 200 हून अधिक धावा करणं शक्य आहे. मुंबईने वानखेडे मैदानावनर खेळल्या गेलेल्या 78 पैकी 49 सामने जिंकले आहेत.
मुंबईतील तापमान आज 30 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. सामन्यानंतर तापमान 27 अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. तसेच आज पावसाची शक्यता नाही. मात्र आर्द्रता 73 टक्यांपर्यंत असणार आहे.
मुंबई इंडियन्स संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, टिळक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.
राजस्थान रॉयल्स संघ : संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, टॉम कोहलर-कॅडमोर, रायन पराग, रोवमन पॉवेल, क्रुणाल सिंग राठोड, आर अश्विन, डोनोवन फरेरा, आवेश खान, टी. बोल्ट, नांद्रे बर्जर, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, केशव महाराज, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक आणि तनुष कोटियन.