Mike Hussey On World cup 2023: आगामी वनडे वर्ल्ड कप (ICC ODI World cup 2023) सुरू होण्यासाठी आता फक्त दीड महिना बाकी आहे. त्यामुळे आता सर्व संघाचे सिलेक्टर्स वर्ल्ड कपची टीमची निवड करताना दिसत आहेत. मात्र, यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वात मोठी दावेदार असलेली टीम म्हणजेच टीम इंडिया (Team India) अजूनही अस्तव्यस्थ दिसत आहे. येत्या 10 दिवसात वर्ल्ड कप संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे, अशातच आता धोनीच्या (MS Dhoni) कोचने मोठं वक्तव्य करत वर्ल्ड कप कोण जिंकणार? यावर मोठी भविष्यवाणी केलीये.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचे फलंदाजी प्रशिक्षक माईक हसी यांनी मोठं वक्तव्य केलंय. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू माईक हसी याने विश्वास व्यक्त केला आहे की, कांगारू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा संघ या वर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषकाची ट्रॉफी जिंकेल. त्यावेळी त्याने संघातील बारकावा देखील सांगितला. नेमकं काय म्हणाला माईक हसी? पाहुया...
मला वाटतं की, ऑस्ट्रेलियाला भारतात चांगली संधी आहे कारण त्यांनी काही काळासाठी खेळाडूंचा एक मोठा गट एकत्र केला आहे. त्या प्रत्येक खेळाडूंना त्यांच्या भूमिका चांगल्याप्रकारे माहीत आहेत आणि त्यांच्या संघात काही सातत्यही आहे. मला वाटतं की ते काही वेगळ्या गोष्टींचा प्रयत्न करत आहेत. त्यावेळी त्याने मार्चमध्ये झालेल्या सामन्यांचा अहवाल दिला. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या मालिकेत भारतीय परिस्थितीत चांगली कामगिरी केली आणि त्यामुळे त्यांना विश्वचषकात जाण्याचा खूप आत्मविश्वास मिळेल, असा विश्वास देखील माईक हसीने व्यक्त केला आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेआधी ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. 22 सप्टेंबरला ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात येणार असून एकदिवसीय मालिका खेळणार आहे. विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलियाच्यादृष्टीने ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे या मालिकेत कोणाचा विजय होतो, त्यावरून वर्ल्ड कपचा खरा दावेदार कोण? यावर सर्वांचं लक्ष असेल.
ऑस्ट्रेलियाचा संघ: पॅट कमिंस (C), डेविड वॉर्नर, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, सेन एबॉट, एस्टन एगर, एलेक्स कॅरी, नाथन एलिस, कॅमरुन ग्रीन, आरोन हार्डी, जॉस हेजलवुड, जोस इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा, मार्कस स्टॉयनिश, एडम झम्पा, ट्रेविस हेड.