Prithvi Shaw career stats: टीम इंडियाचा सर्वात स्फोटक फलंदाज कोण? असा सवाल उपस्थित केल्यास न चुकता तोंडातून नाव निघेल ते म्हणजे विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)... नजफगढ़ का नवाब अशी ओळख (Najafgarh ka Nawab) असलेला सेहवाग मैदानात आला की पहिल्या चेंडूवर प्रेक्षकांना सेलिब्रेशन करण्याची संधी मिळायची म्हणजे मिळायची. बॉलर कोणीही असो पहिला बॉल फोर म्हणजे फोर... असा हा विरेंद्र सेहवाग. मात्र, सेहवागच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाला (Team India) एक स्फोटक फलंदाज लाभला. मात्र, गेली 17 महिने तो संघाच्या (Indian Cricket Team) बाहेर असल्याचं पहायला मिळतंय.
भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉमध्ये (Prithvi Shaw) विरेंद्र सेहवागची झलक दिसते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पृथ्वी शॉने भारतासाठी 12 सामने खेळले आहेत. यामध्ये एकदिवसीय सामन्यांची (ODI) संख्या 6 असली तरी 5 कसोटी (TEST) आणि फक्त 1 टी-20 आंतरराष्ट्रीय (T20) सामना खेळला आहे. आयपीएलमध्ये (IPL) धमाकेदार कामगिरी असताना देखील त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळाली नाही.
पृथ्वी शॉने 5 टेस्टमध्ये एक शतक देखील ठोकलंय. तर 2 अर्धशतक देखील त्याच्या नावावर आहेत. त्याचबरोबर वनडे मध्ये त्याने 6 मॅचमध्ये 189 धावा चोपल्या आहेत. पृथ्वीचा देखील सेहवागसाठी (Virender Sehwag) सलामीला उतरतो. त्याचा स्टाईक रेट देखील सेहवागसारखा आहे. मात्र, सेहवाग अजूनही टीममध्ये सामील होण्याच्या प्रतिक्षेत आहे.
आणखी वाचा - IND vs NZ : माझी इच्छा आहे की...; Hardik Pandya ने फलंदाजांना केली खास रिक्वेस्ट
दरम्यान, विजय हजारे ट्रॉफी 2022 च्या मिझोरम विरुद्ध मुंबई (Vijay Hazare Trophy) सामन्यात पृथ्वी शॉच्या स्फोटक खेळीने मुंबईला विजय मिळवून दिला. त्याने 39 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 54 धावा केल्या होत्या. त्यानंतर अनेकांनी टीम इंडियात स्थान न दिल्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. पृथ्वी नैसर्गिक खेळाडू आहे. तो समोरच्या टीमच्या गिंधड्या करण्यासाठी नेहमी आतूर असतो, असं समालोकच आकाश चोप्रा (Akash Chopra) म्हणतो.