मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढची क्रिकेट सिरीज रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत टी-20, टेस्ट आणि वनडे सामने खेळणार आहे. या सीरीजची सुरुवात उद्या ब्रिस्बेनमध्ये होणार आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात टी20 सिरीजने होणार आहे. 3 सामन्यांची सिरीजमधला पहिला सामना बुधवारी ब्रिस्बेनमध्ये खेळला जाणार आहे. विराट टीम विजयासाठी सज्ज आहे. भारतीय टीमने पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.
भारतीय टीम : विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, युजवेंद्र चहल
ऑस्ट्रेलिया टीम : एरोन फिंच (कप्तान), अॅलेक्स केरी, एश्टन एगर, जेसन बेहरिनडॉफ, नाथन कूल्टर-नाइल, क्रिस लिन, ग्लेन मॅक्सवेल, बेन मैकडरमॉट, डार्सी शॉर्ट, बिली स्टेनलेक, मार्कस स्टोइनिस, एडम जंपा आणि अँड्रयू टाय.
पहिला टी-20 : सामना : 21 नोव्हेंबर 2018, ब्रिस्बेन, दुपारी 1:20 वाजता
दूसरा टी-20 : 23 नवंबर 2018, मेलबर्न, दुपारी 1:20 वाजता
तीसरा टी-20 : 25 नवंबर 2018, सिडनी, दुपारी 1:20 वाजता
भारताने टी-20 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 15 पैकी 10 सामने जिंकले आहेत. 2016 मध्ये जेव्हा भारतीय टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली तेव्हा भारताने चांगली कामगिरी केली होती. भारताने धोनीच्या नेतृत्वात तिन्ही सामने जिंकून ऑस्ट्रेलियाला क्लीन स्विप दिली होती.
पहिली टेस्ट - 6 ते 10 डिसेंबर - एडिलेड - सकाळी 6.30 वाजता
दूसरा टेस्ट - 14 ते 18 डिसेंबर - पर्थ - सकाळी 7.50 वाजता
तीसरी टेस्ट - 26 ते 30 डिसेंबर - मेलबर्न - सकाळी 6 वाजता
चौथा टेस्ट - 3 ते 7 जानेवारी - सिडनी - सकाळी 6 वाजता
हे पण वाचा - जेव्हा धोनीने बस चालवत संपूर्ण टीमला हॉटेलमध्ये पोहोचवलं
पहिली वनडे - 12 जानेवारी - सिडनी - सकाळी 8.50 वाजता
दुसरी वनडे - 15 जानेवारी - एडिलेड - सकाळी 9.50
तीसरी वनडे - 18 जानेवारी - मेलबर्न - सकाळी 8.50
We've announced our 12 for the 1st T20I against Australia at The Gabba #TeamIndia pic.twitter.com/c6boLtieGf
— BCCI (@BCCI) November 20, 2018