मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर विवाहबद्ध झालेत. सोमवारी दोघांनी इटलीमध्ये लग्न केले. विवाहसोहळा काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच पार पडला. यावेळी कुटुंबिय आणि काही मोजका मित्रपरिवार उपस्थित होता. या लग्नात विराटचा एकेकाळचा अंडर-१७मधील सहकारी खेळाडू आणि मित्र वर्तिक तिहारा उपस्थित होता.
या क्रिकेटरचे नाव कदाचित तुम्ही ऐकले असेल. १२ वर्षांपूर्वी जेव्हा विराट अंडर १७ खेळत असे. त्यावेळी वर्तिक त्याचा सहकारी खेळाडू होता. यासोबतच तो संघाचा कर्णधारही होता.
वर्तिक विराटच्या लग्नातील सर्व समारंभामध्ये होता. याशिवाय विराटच्या लग्नात त्याचा मॅनेजर वैभवशिवाय दिल्लीतील स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळणारा मित्र वत्सही होता.
अनुष्काला मीडियापासून दूर राहत डेस्टिनेशन वेडिंग करायचे होते. त्यामुळे इटलीच्या टस्कनीजवळील बोरगो रिसॉर्ट निवडण्यात आले होते. हा भाग शहरापासून दूर आहे. थंडीमध्ये ही जागा बंद असते. मात्र विराट आणि अनुष्काच्या लग्नासाठी ही जागा सुरु करण्यात आली होती.
येथील गावात ५ मोठे व्हिला आहे. या व्हिलामध्ये एकूण २२ खोल्या आहेत. यात ४४ लोक राहू शकतात. रिपोर्ट्सनुसार, लग्नासाठी एकूण ५० जणांना निमंत्रण देण्यात आले होते. येथे एका व्यक्तीचा राहण्याचा खर्च तब्बल एक कोटी रुपये आहे याचाच अर्थ विराट आणि अनुष्काच्या लग्नातील पाहुण्यांचा राहण्याचा खर्च साधारण ४५ ते ५० रुपये झाला असावा.