Virat Kohli Favorite Dish: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली क्रीडा जगतात त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. तो त्याच्या फिटनेसशी तडजोड करत नाही. विशेषता मोठ्या सामन्यावेळी विराट आपला डाएट प्लॅन नेहमी फॉलो करताना दिसतो. मात्र, तुम्हाला माहितीये का?, अशी एक डिश आहे, ज्यामुळे विराट त्याचा डाएट प्लॅन (Virat Kohli Diet plan) देखील मोडू शकतो.
तर होय, विराट कोहलीला छोले भटुरे खूप आवडतात, तेही दिल्लीतीमधील छोले भटुरे. विराट कोहली हा फक्त दिल्लीचा रहिवासी असल्याने तो गल्लोगल्ली फिरला आहे. त्याला छोले भटुरे इतकं आवडतं की तो त्यासाठी आपला डाएट प्लॅन देखील मोडू शकतो. दिल्लीच्या राजौरी गार्डनमध्ये रामचं दुकान आहे, तिथले छोले भटुरे खूप प्रसिद्ध आहेत.
विराटला देखील राजौरी गार्डनचे छोले भटुरे (virat kohli favourite chole bhature) खुप आवडतात. काही दिवसांपूर्वी विराट कोहलीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात त्याने रामच्या छोले भटुऱ्याची आठवण काढली होती (virat kohli delhi wale chole bhature). अशातच आता टी-ट्वेंटी वर्ल्डकप आधी विराटला छोले भटुऱ्याची आठवण येत आहे.
@imVkohli and his endless love for Chole - Bhature pic.twitter.com/k3P3D5oYMw
— virushka.xx (@LoveVirushka) June 6, 2020
विराट पत्नी अनुष्का शर्मा आणि कुटुंबासह मुंबईत राहतो. मुंबईत असल्याने विराटला दिल्लीतील छोले भटुरे आठवले. मग काय विराटने अनुष्कासमोर हट्ट धरला. अनुष्काने आपल्या लाडक्या नवऱ्याची इच्छा पुर्ण करण्याचा निर्धार केला.
अनुष्काला मुंबईतही असे एक दुकान सापडले, जिथे दिल्लीप्रमाणेच चविष्ट छोले भटुरे मिळतात. तसेच अनुष्काने कोहलीला छोले भटुरेची ट्रीट दिली. मुंबईत दिल्लीसारखे स्वादिष्ट छोले भटुरे मिळाल्याने कोहलीला आनंद झाला (anushka sharma virat kohli chole bhature).
अनुष्काने इन्टाग्रामवर (anushka sharma instagram) पोस्ट शेअर केली. त्यामध्ये तिने मुंबईत दिल्लीसारखे स्वादिष्ट छोले भटुरे मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. चेंबरमधील 'दिल्ली से' दुकानात जाऊन तुम्ही छोले-भटूरे मस्त खाऊ शकता. फक्त छोले-भटुराच नाही तर इथे तुम्ही पराठे आणि अमृतसरी छोले देखील छान आहेत, असं अनुष्का म्हणाली.