मुंबई : हा फोटो व्हॉटसअॅप, फेसबुकवर व्हायरल झाल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला हा फोटो नेमका कधी काढण्यात आला आहे, यात छोटा मुलगा विराट कोहली दिसतोय, आणि ज्याकडून कौतुकाची थाप देणारा आहे आशिष नेहरा.
विराटला या फोटोविषयी विचारण्यात आलं, त्यावर विराट म्हणाला, हा फोटो २००३ मधील आहे. २००३ च्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व केल्यानंतर नेहरा मायदेशी परतला होता. यावेळी एका कार्यक्रमातील हा फोटो आहे, तेव्हा मी १३ वर्षांचा होतो. शाळेच्या टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी, त्यावेळी माझा संघर्ष सुरु होता, असंही विराट सांगतो.
नेहराविषयी बोलताना विराट कोहलीने सांगितलं एका बॉलरसाठी १९ वर्षे मैदानात खेळणे कठीण आहे. नेहराने मेहनतीच्या जोरावर ही १९ वर्षे सतत गाजवली. आशिष नेहरा आतापर्यंत १७ कसोटी, १२० वन-डे, २७ टी-२० सामने खेळला. यात कसोटीत ४४, वनडेत- १५७ आणि टी-२० सामन्यात ३४ बळी नेहराच्या नावे आहेत. अखेरच्या सामन्यात नेहराला एकही बळी मिळवता आला नाही, हे देखिल एक विशेष.