मुंबई : 26 मार्चपासून पुन्हा एकदा आयपीएला डंका वाजणार आहे. सर्व क्रिकेट चाहते या दिवसाची वाट पाहतायत. आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात अनेक रेकॉर्ड बनले. यावेळी दिग्गज खेळाडूंचे वादविवादंही पहायला मिळतात. दरम्यान यंदाच्या आयपीएलमध्ये चाहत्यांचं लक्ष हे विराट कोहली आणि रोहित शर्मावर असणार आहे. या दोघांमधील कोण सरस ठरणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
दरम्यान आयपीएलचा रेकॉर्ड पाहिला तर दोघांमध्ये कोणतीही रेस दिसून येत नाही. कारण आकडे पाहिले तर कर्णधार म्हणून रोहित सर्वश्रेष्ठ आहे तर फलंदाजीमध्ये विराट कोहली सरस ठरतो.
विराट कोहली- 207 मॅच, 6283 रन्स, 37.39 सरासरी, 5 शतकं, 42 अर्धशतकं
रोहित शर्मा- 213 मॅच, 5611 रन्स, 31.17 सरासरी, 1 शतकं, 40 अर्धशतकं
विराट कोहली- एकूण मॅच 140, विजय 64, पराभव 69
रोहित शर्मा- एकूण मॅच 129, विजय 75, पराभव 50
रोहित शर्माच्या येण्याने मुंबई इंडियन्सचं पूर्ण नशीबच बदललं आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीमने आतापर्यंत पाचवेळा आयपीएलचा खिताब जिंकला आहे. मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019, 2020 या वर्षांमध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. तर दुसरीकडे विराट कोहलीची पाटी कोरीच आहे.