Pakistan Cricket Team : पाकिस्तान टीमचा वर्ल्ड कपमधील प्रवास अत्यंत खराब राहिलाय. पाकिस्तानला युएसए आणि टीम इंडियाकडून पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे पाकिस्तानचं सुपर 8 मध्ये पोहोचण्याचं स्वप्न अपूरंच राहिलंय. अशातच आता कॅप्टन बाबर आझमवर (Babar Azam) टीका होताना दिसते. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील चार सामन्यांमध्ये बाबर आझम केवळ 101.66 च्या स्ट्राइक रेटने केवळ 122 धावा करू शकला आहे. त्यामुळे आता बाबर आझमवर टीका होताना दिसते. अशातच आता टीम इंडियाचा माजी विस्फोटक सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने बाबर आझमवर टीकेचा वर्षाव केलाय. त्यावेळी विरूने मोठं वक्तव्य केलंय.
बाबर आझमचा खेळण्याचा अंदाज तसाच आहे, तो सिक्स मारून खेळणारा प्लेयर नाहीये. जेव्हा स्पिन होतो बॉल आणि जेव्हा बाबर सेट होतो, तेव्हाच तो बॉल उचलून खेळू शकतो. मी कधी त्याला फास्टर बॉलरचा पुढं येऊन सिक्स मारताना पाहिलं नाही. तो त्याचा गेम नाहीये. तो ग्राऊंड शॉट खेळतो. तो नेहमी सेफ क्रिकेट खेळतो, त्यामुळे तो कायम रन बनवताना दिसतो. त्यामुळेच कदाचित त्याचा स्ट्राईक रेट एवढा चांगला नाहीये, असं विरेंद्र सेहवागने म्हटलं आहे.
पण जेव्हा तुम्ही टीमचे कॅप्टन असता, तेव्हा तुम्ही विचार केला पाहिजे की, खरंच हा खेळ माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी चांगला आहे का? जर नसेल तर तुम्हा खालच्या क्रमांकावर खेळलं पाहिजे, तुम्ही वर अशा खेळाडूला पाठवा ज्याचं कामच फक्त 6 ओव्हरचं असेल. बाबरला याबाबत विचार करावा लागेल. पण मी कठोर शब्दात म्हटलं तर, जर पाकिस्तानचा कॅप्टन बदलला तर बाबर आझमला या टीममध्ये संधी मिळेलच असं नाही. कारण त्याचा स्ट्राईक रेट आणि त्याची कामगिरी अशी नाहीये की तो आजच्या टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये खेळू शकतो, असं मोठं वक्तव्य विरेंद्र सेहवागने केलंय.
दरम्यान, अखेरच्या सामन्यात देखील पाकिस्तानवर पराभवाचं सावट होतं. मात्र, बाबर आझमच्या नाबाद 32 धावांच्या जोरावर पाकिस्तानने रविवारी आयर्लंडचा तीन गडी राखून पराभव केला. त्यामुळे पाकिस्तानच्या वर्ल्ड कप प्रवासाचा शेवट गोड झाला एवढीच गुड न्यूज पाकिस्तानी फॅन्ससाठी आहे. अशातच आता येत्या काळात पाकिस्तान संघाला मोठे निर्णय घ्यावे लागतील, एवढं मात्र नक्की...!