मिशन वर्ल्डकपमध्ये भारताचं एक पाऊल पुढे; टीम इंडियासमोर विंडिजची हाराकिरी

आयसीसी महिला वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने दुसरा विजय मिळवला आहे.

Updated: Mar 12, 2022, 01:42 PM IST
मिशन वर्ल्डकपमध्ये भारताचं एक पाऊल पुढे; टीम इंडियासमोर विंडिजची हाराकिरी title=

न्यूझीलंड : आयसीसी महिला वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने दुसरा विजय मिळवला आहे. पाकिस्ताननंतर वेस्ट इंडिजचा देखील टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडने पराभव केला आहे. न्यूझीलंडविरूद्ध पराभव स्विकारल्यानंतर टीम इंडियावर टीका करण्यात येत होती. मात्र आता महिलांनी 155 रन्सने वेस्ट इंडिजच्या टीमचा पराभव केला आहे.

टीम इंडियाने वेस्ट इंडिजला 318 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. हे टार्गेट पार करताना वेस्ट इंडिजच्या महिला टीमला केवळ 162 रन्सचं करण्यात आले. वेस्ट इंडिजकडून Deandra Dottinने सर्वाधिक 62 रन्स केले. वेस्ट इंडिजची ओपनिंग जोडी मैदानावर उतरली तेव्हा भारताला इतका सहज विजय मिळणं शक्य वाटलं नव्हतं. मात्र गोलंदाजांची कमाल करत वर्ल्डकपमध्ये दुसरा सामना जिंकला आहे.

टीम इंडियाकडून स्नेह राणाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर मेहना सिंग हिने 2 विकेट्स काढल्या. तर झूलन, राजेश्वरी गायकवाड आणि पूजा वस्त्राकर यांनी 1-1 विकेट घेत वेस्ट इंडिजला 162 रन्समध्ये गुंडाळलं.

मंधाना आणि कौरचं शतक

भारताकडून स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौरने उत्तम खेळी करून शतक झळकावलं आहे. मंधानाने 119 बॉलमध्ये 123 रन्स केले. यामध्ये 13 चौकार आणि 2 सिक्सचा समावेश आहे. तर हरमनप्रीत कौरने 107 बॉल्समध्ये 109 रन्सची खेळी केली आहे.