प्रॉविडेंस : भारताने आयसीसी महिला टी 20 विश्व कपमध्ये तिसरा विजय मिळवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. गुरूवारी तिसऱ्या ग्रुपमध्ये आयरलँडला 52 धावांनी हरवलं आहे. भारतीय संघ या अगोदर न्यूझीलँडला 34 धावांनी तर पाकिस्तानला 7 विकेटने हरवलं आहे. भारतीय संघ तिसऱ्यांदा सेमीफायनलपर्यंत पोहोचला आहे. या अगोदर 2009 आणि 2010 मध्ये सेमीफायनल स्वतःच स्थान निश्चित केलं आहे.
भारतीय महिला टीमने तीन विजयानंतर सहा अंक पटकावले असून आता ग्रुप बीमध्ये ऑस्ट्रेलियासोबत संयुक्त रूपात पहिल्यानंबरवर आहे. ऑस्ट्रेलियाने देखील आपल्या तिन्ही सामन्यांवर विजय मिळवला आहे.
आता हे दोन्ही संघ शेवटची ग्रुप मॅच 17 नोव्हेंबरसोबत खेळणार आहोत. यावरून हे निश्चित होणार की कोणता संघ ग्रुपमध्ये टॉपमध्ये असेल.
भारताच्या विजयासोबत पाकिस्तानसोबत बाकीचे तिन्ही टीम सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर पडली आहेत.
टीम इंडियाने आयरलँडला 52 धावांची टक्कर दिली. टॉस हरून टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 6 विके गमावून 145 धावा केल्या. याला उत्तर देताना आयरलँडची संपूर्ण टीम 8 विकेट गमावून फक्त 93 धावा करू शकली.