लॉस एंजिलिस : स्टेपल्स सेंटरमध्ये डब्ल्यूडब्ल्यूई 'नो मर्सी' जॉन सीना आणि रोमन रेंज यांच्यात मोठा सामना झाला. ज्यामध्ये रोमन रेंजने जॉन सीनाला चांगलेच थकविले. सीनानेही जोरदार फाईट करण्याचा प्रयत्न केला पण रोमनने सीनाला गुडघे टेकण्यास भाग पाडले. या सामन्यानंतर सीनाची शेवटची फाईट होती का ? अशी सगळीकडे चर्चा होती.
Why did @JohnCena feel like a burden was lifted off of his shoulders after coming up short against @WWERomanReigns at #WWENoMercy? pic.twitter.com/a85yvoZqBp
— WWE (@WWE) September 25, 2017
दरम्यान जॉन सीना 'रॉक टॉक शो' मध्ये दिसून आला. शोच्या होस्टने विचारलेल्या प्रश्नाला जॉन सीनाने असे काही उत्तर दिले की त्याच्या डब्ल्यूडब्ल्यूईतील भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह उभे केले आहे. तो म्हणाला, मॅच हारल्यानंतर माझ्या खांद्यावरून खूप मोठे वजन हलके झाले आहे. एवढेच नव्हे तर सामना गमावल्यानंतर सिनाने एक ट्विट केले. ज्यामध्ये त्यांने केवळ 'धन्यवाद' असे लिहिले. या ट्विटचा अर्थ वेगवेगळा काढला जात आहे.
सीनाने निवृत्ती स्वीकारली असा अर्थ काढला तर काही म्हणाले की त्याने चित्रपटांमध्ये काम करायला सुरूवात केली आहे.
— John Cena (@JohnCena) September 25, 2017
तो टॉक शोमध्ये म्हणाला की, "मी ४० वर्षांचा आहे आणि डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये १५ वर्षांचा अनुभव घेतलेला अनुभव आहे. ही एक मोठी लेवल आहे. मला माहित नाही मी डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये कुठपर्यंत खेळू शकेन. " जॉन सीनाचा जन्म २३ एप्रिल १९७७ रोजी झाला. सेना एक रेसलर, बॉडीबिल्डर, रॅपर आणि अॅक्टर आहे. तो सध्या डब्लूडब्लूईचा भाग आहे.