नाराजी

जसवंत सिंहांचं बंड, बारमेरहून अपक्ष निवडणूक लढवणार

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांनी अखेर राजस्थानमधील बारमेर मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर केलाय. ते उद्या सोमवारी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर जसवंत सिंह यांचे पुत्र आणि भाजपचे आमदार असलेले मानवेंद्र सिंह यांनीही पक्षाचं काम करणं अचानकपणे बंद केलंय.

Mar 23, 2014, 01:03 PM IST

शिवसेनेची समजूत काढण्यासाठी भाजपची धावाधाव

भाजप आणि मनसेतल्या वाढत्या जवळीकीमुळं नाराज झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपची धावाधाव सुरू झालीयं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहेत.

Mar 11, 2014, 12:56 PM IST

नारायण राणे दूर करणार सामंतांची नाराजी?

काँग्रेस नेते नारायण राणे हे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेणार आहेत.

Mar 8, 2014, 06:08 PM IST

फेसबुक स्टेटसवरून शुभा राऊळ यांनी व्यक्त केली नाराजी

शिवसेनेत सध्या महिला नगरसेविकांची मुस्कटदाबी होतेय. शिवसेनेच्या रणरागिणींना सध्या पक्षातील स्वकियांविरूद्धच दोन हात करावे लागतायेत. स्थानिक नेतृत्वावर आपली नाराजी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

Jan 13, 2014, 01:31 PM IST

राज ठाकरेंच्या निर्णयामुळं मनसेत नाराजी

मनसे चित्रपट कर्मचारी सेनेला आज ग्लॅमरचा तडका देण्यात आला. मराठी हिंदी सिनेसृष्टीतल्या स्टार्सच्या आज थेट पदांवर नियुक्त्या करताना राज ठाकरे यांनी संघटनेत कठोर फेरबदलही केलेत. एकीकडे राज कुंद्रा प्रकरणात वादात सापडलेल्या नेत्यांना अभय देण्यात आलं. पण त्याचवेळी याप्रकरणाशी संबंधित पदाधिकाऱ्यांना पदावरुन हटवल्यानं पक्षात नव्या वादाला तोंड फुटलंय.

Nov 18, 2013, 09:27 PM IST

नाराज जोशी सर कुठे गेले?

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात अपमानित होऊन घरी परतलेले शिवसेना नेते मनोहर जोशी कुठं गेलेत, याचा पत्ता सरांच्या कार्यकर्त्यांनाही नाही.

Oct 14, 2013, 07:28 PM IST

शिवसेनेचे आमदार वरिष्ठ नेत्यांवर नाराज

शिवसेनेचे आमदार पक्षाच्या विधीमंडळातल्या वरिष्ठ नेत्यांवर नाराज असल्याचं वृत्त आहे. दोन दिवसांपूर्वी नागपूरात शिवसेना आमदारांची एक बैठक झाली. यावेळी ज्येष्ठ नेते तरुण आणि ग्रामीण भागातल्या आमदारांना विश्वासात घेत नसल्याचं तसंच सभागृहांत बोलण्याची संधीच देत नसल्याबद्दल नाराजीचा सूर उमटलाय.

Dec 16, 2012, 06:45 PM IST

पवारांची नाराजी महाराष्ट्राच्या पथ्यावर?

शरद पवारांची नाराजी दुर करण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला विशेष पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यातले दुष्काळग्रस्त आणि सिंचन प्रकल्पाच्या मदतीसाठी केंद्र सरकार साडे तीन हजार कोटींची मदत करणार असल्याचं समजतंय.

Jul 25, 2012, 12:39 PM IST

आठवलेंना केले 'राजी' दूर झाली 'नाराजी'

आरपीआय नेते रामदास आठवलेंची नाराजी अखेर दूर झाली आहे. मुंबई महापालिकेच्या निकालापासून सुरु झालेली नाराजी, राज्यसभेच्या निवडीनंतर उघड झाली होती. गेल्या काही दिवसात आठवले शिवसेनेवर नाराज असून ते महायुतीतून बाहेर जाणार असल्याच्या शक्य़ता वर्तवण्यात येत होत्या.

Apr 3, 2012, 04:36 PM IST