राहुल द्रविड

चॅपेल प्रकरण : सचिनचे झहीर, हरभजनकडून समर्थन

सचिनचे झहीर खान आणि हरभजनसिंग यांनी समर्थन केले आहे. तर ग्रेग चॅपेल यांनी राहुल द्रविडला कर्णधारपदावरून हटविण्याबाबतचा दावा फेटाळून लावला आहे. दरम्यान, मी पुस्तक वाचल्यानंतर मला वाटल्यास मत व्यक्त करेन, अशी सावध प्रतिक्रिया राहुल द्रविड यांनी दिलेय.

Nov 5, 2014, 09:07 AM IST

'द्रविडला हटवण्याविषयी सचिनचे दावे खोटे' - चॅपेल

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा दावा खोटा असल्याचं भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी म्हटलं आहे.  राहुल द्रविडला कर्णधारपदावरून हटविण्याचा आपण विचारही केला नव्हता, असेही चॅपेल यांनी स्पष्ट केले आहे.

Nov 4, 2014, 08:27 PM IST

संगकारनं द्रविडला टाकलं मागे, टेस्टमध्ये 37वं शतक

श्रीलंकेचे स्टार बॅट्समन कुमार संगकारानं आज पाकिस्तानविरोधात आपल्या शतकी खेळीदरम्यान 2014मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 रन्स करणारा पहिला बॅट्समन बनलाय. तसंच एका वर्षात सर्वाधिक सहा वेळा 2000 पेक्षा जास्त रन्स बनवण्याचा कारनामाही संगकारानं केलाय.  

Aug 9, 2014, 06:22 PM IST

'द वॉल राहुल' जेव्हा 'मास्टर ब्लास्टर'ची मिमिक्री करतो

टीम इंडियाची द वॉल असा लौकिक मिळवणारा राहुल द्रविड हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची नक्कल करतो, हे पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही, कारण राहुल द्रविडला सचिनप्रमाणेचं क्रिकेटमध्ये जंटलमन म्हटलं जातं.

Jul 10, 2014, 04:08 PM IST

धोनीसह द्रविडची आजपासून पहिली 'टेस्ट'!

भारतच्या इंग्लंड दौऱ्याला आजपासून सुरुवात होतेय. पहिली टेस्ट ट्रेंटब्रिजमध्ये रंगणार आहे. 2011 च्या दौऱ्यात भारताला 4-0 नं सपाटून मार खावा लागला होता. या पराभवचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया आतूर असणार आहे. 

Jul 9, 2014, 01:06 PM IST

मला सर्वश्रेष्ठ व्हायचंय, सल्ल्याची गरज नाही- कोहली

टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीला उपरती झालेली आहे. त्यानं आपल्याला आता कोणाच्याही सल्ल्याची गरज नसल्याचं म्हटलंय. टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. लंडनमध्ये बीसीसीआय टीव्हीशी बोलतांना कोहलीनं कोहलीनं सोमवारी स्वत:च्या खेळाचं आणि क्षमतेचं मूल्यमापन केलं.

Jul 1, 2014, 01:48 PM IST

'द वॉल' पुन्हा टीम इंडियात

टीम इंडिया 'द वॉल' अशी ओळख असलेला माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. द्रविड हा आता टीम इंडियाचा बॅटींग सल्लागार बनला आहे.

Jun 29, 2014, 12:02 PM IST

राहुल द्रविडच्या सासूबाईंनाही बसला चेन स्नॅचिंगचा फटका

राज्यात चेन स्नॅच‌िंगच्या घटना खूप मोठ्या संख्येनं घडतांना दिसतायेत. नागपूरातही सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ वाढलाय. या चोरांचा फटका केवळ सामान्य नागरिकांनाच नाही तर सेलिब्रेटींच्या नातेवाईकांनाही बसतोय. द वॉल राहुल द्रविडच्या सासूबाईंनाही हा फटका बसलाय.

Jun 11, 2014, 01:46 PM IST

राहुल द्रविडचे सहकार्य हे माझे भाग्य: शेन वॉटसन

जागतिक क्रिकेटमध्ये `द वॉल` या नावाने प्रसिद्ध असणारा राहुल द्रविड संघाच्या पाठीशी असणे, म्हणजे माझे भाग्य असल्याचे शेन वॉटसनने म्हटलंय.

May 13, 2014, 06:39 PM IST

टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी द्रविड 'नॉट इंट्रेस्टेड'

टीम इंडियाच्या खराब कामगिरीमुळे कोच डंकन फ्लेचर हटाव मोहिमेला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर सुनील गावसकर यांनी फ्लेचर यांची हकालपट्टी करून राहुल द्रविड याला भारताचा कोच म्हणून नियुक्त करण्याचा सल्लाही `बीसीसीआय`ला दिलाय. मात्र, टीम इंडियाचा कोच म्हणून काम करण्यासाठी द्रविड फारसा उत्सुक नाही.

Mar 15, 2014, 10:25 AM IST

सचिन, वॉर्न पुन्हा लॉर्ड्सवर खेळणार!

क्रिकेटचा मक्का समजल्या जाणार्‍या लॉर्ड्सच्या २००व्या जन्मदिनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दिग्गज ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर शेन वॉर्न पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकताना ठाकणार आहेत.

Feb 7, 2014, 03:29 PM IST

‘द वॉल’ राहुल द्रविडला जॅक कॅलिसनं टाकलं मागे!

दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसनं आपल्या अखेरच्या टेस्टमध्ये ११५ रन्सची शानदार इनिंग खेळली. अखेरच्या टेस्टमध्ये सेंच्युरी ठोकणारा तो ४० वा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ठरला. तर चौथा आफ्रिकन ठरला.

Dec 29, 2013, 06:53 PM IST

माझं पहिलं प्रेम टेस्ट क्रिकेटच- राहुल द्रविड

चॅम्पियन्स लीगमध्ये अखेरची मॅच खेळल्यानंतर ‘द वॉल’ राहुल द्रविडनं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र ज्या क्रिकेटवर नितांत प्रेम केलं, त्या टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर मी अधिक भावनाविवश झालो, असं मत व्यक्त करत द्रविड म्हणाला की, टेस्ट क्रिकेटच माझं पहिलं प्रेम आहे.

Oct 8, 2013, 03:11 PM IST

सावलीतला सूर्य तो...

राहुल द्रविडमध्येही काही मर्यादा होत्या. मात्र आपल्या मर्यादा समजून घेत टीमसाठी सर्वस्व ओतणारा खेळाडू म्हणून तो नेहमीच ओळखला जाईल. त्याची प्रत्येक लाजवाब खेळी ही त्याच सामन्यात त्याच्या सहकारी खेळाडूनं केलेल्या एखाद्या ऐतिहासिक खेळीपुढे झोकाळून गेलीय. समोरचा खेळाडू संपूर्ण बहरात असताना त्याला टीमच्या हितासाठी साथ देणे आणि त्याचबरोबर आपला ही सर्वोत्तम खेळ तितक्याच योग्यतेने खेळण्याची कला असलेले किती सभ्य खेळाडू आज क्रिकेटजगतात शिल्लक आहेत?

Oct 8, 2013, 08:44 AM IST