मावळमधून सेनेतर्फे श्रीरंग बारणे, बाबरांचा पत्ता कापला
मावळमधून शिवसेनेनं श्रीरंग बारणे यांना लाकसभेची उमेदवारी दिली आहे. मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत बारणेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय.
Mar 11, 2014, 07:36 PM ISTराजू श्रीवास्तवने समाजवादी पार्टीचे तिकिट केले परत
हास्य कलाकार राजू श्रीवास्तव याने लोकसभा निवडणुकीचे समाजवादी पार्टीनं दिलेलं तिकीट परत केलेय. कानपूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी राजू विरोधात असहकार पुकारल्याने तो नाराज होता. त्यामुळे हे तिकिट परत केल्याचे राजू यांनी स्पष्ट केले आहे.
Mar 11, 2014, 05:47 PM ISTअण्णा हजारे उतरणार लोकसभेच्या रिंगणात!
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शिर्डीचे शिवसेना उमेदवार बबन घोलप आणि उस्मानाबादचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात प्रचार करणार आहेत. भ्रष्ट उमेदवारांना आणि त्यांना संधी देणाऱ्या पक्षांना जागा देणाऱ्या पक्षांना जागा दाखविण्याचा निर्धार अण्णांनी केलाय. अण्णांच्या या निर्धारामुळं निवडणुकीतली रंगत आणखी वाढलीय.
Mar 9, 2014, 08:58 PM ISTनिवडणूक लढवणारच, `मनसे`ची पहिली यादी जाहीर
मनसेच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेसाठी आपल्या पहिल्या सात उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत...
Mar 9, 2014, 01:12 PM ISTलोकसभा निवडणूक : `मनसे`चे संभाव्य उमेदवार
लोकसभा निवडणूक लढवण्याचं मनसेनं निश्चित केलंय. त्यामुळे कार्यकर्त्यांत आणि इतर पक्षांचीही उत्सुकता आता प्रचंड ताणली गेलीय.
Mar 9, 2014, 10:39 AM ISTमनसेचा आठवा वर्धापनदिन सोहळा...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आठवा वर्धापन दिन आज साजरा होतोय. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर पक्षाध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय संदेश देणार? याकडं सगळ्याचं लक्ष आहे.
Mar 9, 2014, 10:24 AM ISTकाँग्रेसची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर
काँग्रेसनं लोकसभेसाठी १९४ जणांची पहिली उमेदवारांची यादी जाहीर केलीय. पहिल्या यादीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गाधींचं तसेच राहुल गांधीचंही नाव आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातून २७ पैकी १३ उमेदवारांची नावं काँग्रेसनं जाहीर केलीय. काँग्रेसनं महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व विद्यमान खासदारांना संधी दिलीय.
Mar 8, 2014, 10:18 PM ISTनारायण राणे दूर करणार सामंतांची नाराजी?
काँग्रेस नेते नारायण राणे हे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेणार आहेत.
Mar 8, 2014, 06:08 PM ISTलोकसभा निवडणूक : भाजपचे दुसऱ्या यादीत ५२ उमेदवार जाहीर
भाजपने लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये ५२ उमेदवारांची नावे आहेत. परंतु यामध्ये नरेंद्र मोदींचे नाव नाही. मात्र, कर्नाटकातील बीएस येडियुरप्पा यांना शिमोगा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
Mar 8, 2014, 03:02 PM ISTआज काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार?
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर आज काँग्रेसची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यताय. आतापर्यंत भाजप शिवसेना राष्ट्रवादी आम आदमी पक्षानं आपल्या उममेदवारांची यादी घोषित केलीये.
Mar 7, 2014, 05:46 PM ISTनिवडणुकीमुळे ४७६ पेपर मुंबई विद्यापीठाने पुढे ढकलले
लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यात खऱ्या मात्र, याचा फटका दहावीच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. लोकसभा निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाने काही परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. निवडणुका आणि परीक्षा एकाच वेळी आल्यानं सुमारे ४७६ पेपर पुढे ढकलले आहेत.
Mar 6, 2014, 11:28 AM ISTलोकसभा निवडणुकीत प्रिती देणार प्रियाला टक्कर?
बॉलिवूडमध्ये अभिनेत्री प्रिती झिंटाच्या राजकीय प्रवेशावरून जोरदार चर्चा रंगलेली दिसतेय. प्रिती झिंटा अभिनेता संजय दत्तची बहिण प्रिया दत्त हिला लोकसभा निवडणुकीत टक्कर देण्याची शक्यता आहे.
Mar 4, 2014, 04:14 PM ISTबीडमध्ये राष्ट्रवादीकडून सुरेश धस मैदानात
अखेर, राष्ट्रवादीचा बीडच्या उमेदवारीचा तिढा सुटलाय. राष्ट्रवादीनं बीडमधून महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांना उमेदवारी देऊन त्यांच्यावर विश्वास दर्शविलाय.
Mar 3, 2014, 01:22 PM ISTराहुल गांधींचा 'किस' घेणाऱ्या महिलेला दिले पेटवून
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आसामच्या जोरहाटमध्ये एका कार्यक्रमात महिलांनी गराडा घालत `किस` केला होता. चुंबन घेणाऱ्या महिलेच्या पतीने तिलाच पेटवून दिले आणि स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आसाममध्ये घडली.
Mar 1, 2014, 11:57 AM ISTलोकसभा निवडणूक : `भाजप`ची पहिली यादी जाहीर
`आप` आणि `राष्ट्रवादी काँग्रेस`नंतर भाजपनंही लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. भाजपनं जाहीर केलेल्या या पहिल्या यादीत १७ उमेदवार निश्चित करण्यात आलेत.
Feb 27, 2014, 09:57 PM IST