शिक्षण मंडळाचा घोळ, शिवसेनेचं अनोखं आंदोलन
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाचा गलथान कारभार अजूनही सुरूच आहे. शाळा सुरु होऊन दीड महिना झाला तरी बहुतांश विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळालेलं नाही. याविरोधात शिवसेनेनं अनोखं आंदोलन करत शिक्षणाधिका-यांना बूट, वह्या आणि दफ्तर भेट दिलं.
Jul 17, 2012, 06:16 PM ISTआ गया है देखो 'बॉडीगार्ड' !
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आत्ता बॉडीगार्डही उतरणार आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकांना ट्रेन करणारा मास्टर बॉडीगार्ड अमित साखरकर शिवसेनेकडून इच्छुक आहे.
Jan 25, 2012, 10:34 PM ISTनाशिकमध्ये युतीत चाललंय काय?
नाशिकमध्ये युती तुटणार की काय, अशी चिन्हं दिसू लागली आहेत. नेत्यांचे आदेश येऊनही युतीची एकही बैठक झालेली नाही. आधी आक्रमक असलेले भाजप नेते आता मवाळ झालेत तर शिवसेना मात्र भाजपला झुलवत ठेवत आहे.
Jan 19, 2012, 09:35 AM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला धक्का
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांचे निकटवर्तीय जगदीश शेट्टी आणि त्यांचे नगरसेवक भाऊ उल्हास शेट्टी यांचं जातप्रमाणपत्रं खोटं असल्याचा आरोप शिवसेना खासदार गजानन बाबर यांनी केला आहे.
Jan 18, 2012, 09:57 AM ISTनिरुपमच्या तोंडाला मी काळं फासणारच...
विनोद घोसाळकर
मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे. कारण माझ्या पदापेक्षा मला नेहमीच मराठी स्वाभिमान हा मला हजारपटीने जास्त महत्त्वाचा वाटतो. कारण, मी हाडाचा शिवसैनिक आहे. हे संजय निरुपमने लक्षात ठेवावं.