सायना नेहवाल फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये
भारताची अव्वल बॅडमिंटनपटू साईना नेहवालने फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. साईनाने सेमीफायनमध्ये जर्मनीच्या ज्युलियन शेंक हिच्यावर २१-१९, २१-८ अशी मात केली.
Oct 28, 2012, 03:40 PM ISTफ्रेंच ओपन : सायना सेमीफायनलमध्ये
भारताच्या सायना नेहवालने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आहे. तिने आपला फॉर्म कायम ठेवत फ्रेंच ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे.
Oct 27, 2012, 07:02 PM IST`डेन्मार्क ओपन बॅडमिंटन`वर सायनाचा ताबा
डेन्मार्क ओपनच्या अंतिम फेरी सायनानं जर्मनीच्या ज्युलियन शेंकवर मात मिळवत सायनानं डेन्मार्क ओपन सुपर सीरीज बॅडमिंटन टूर्नामेंटची महिला एकेरी स्पर्धा आपल्या नावावर केलीय.
Oct 21, 2012, 10:21 PM ISTसायना नेहवाल अंतिम फेरीत
भारताच्या सायना नेहवालने डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीत तिस-या मानांकित सायनासमोर अव्वल मानांकित चीनच्या यिहान वॅँगचे आव्हान होते. मात्र दुखापतीमुळे यिहानने माघार घेतली.
Oct 20, 2012, 09:42 PM ISTसायना डेन्मार्क ओपनच्या उपान्त्यपूर्व फेरीत
भारताची धडाकेबाज बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालने डेन्मार्क ओपन स्पर्धेत आपली आगेकूच कायम ठेवली आहे. तिने जपानच्या मिनात्सू मितानीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
Oct 20, 2012, 01:38 PM ISTसायना उडविणार लष्कराचं विमान
लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडलची कमाई करत सायना नेहवालनं इतिहास रचला होता. या विक्रमानंतर सायना एक नवी उंचीही गाठणार आहे. किरण एमके-2 या लढाऊ विमानातून सायनाला उड्डाण करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे हवाई दलाकडून सन्मान मिळाल्यानं सायना सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या पंक्तीत जाऊन बसली आहे.
Sep 22, 2012, 06:29 PM IST'वेल डन सायना', दिल्लीत जंगी स्वागत!
लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला ब्राँझ मेडलची कमाई करून मायदेशी परतलेल्या बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे दिल्ली एअरपोर्टवर जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
Aug 7, 2012, 12:10 PM ISTलंडन ऑलिम्पिक - सुपर सायना सेमीत
वर्ल्ड क्रमांक चार असलेल्या भारताच्या सायना नेहवालने झंझावाती खेळ करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ऑलिम्पिक बॅडमिंटनच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
Aug 3, 2012, 06:50 PM ISTलंडन ड्रीम्स
जॉयदीप कर्माकरनं 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात फायनल्या शर्यतीत आहे. जॉयदीपनं फायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित केल्यास त्याच्याकडून मेडलच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जॉयदीपनं क्वालिफायमध्ये शानदार कामगिरी केली आहे
Aug 3, 2012, 03:50 PM ISTविजयी 'चायना', पराभूत सायना
सायना नेहवाल उपांत्य फेरीत जागतिक पातळीवरील क्रमांक एकची चीनची खेळाडू यिहान वांग हिच्याकडून सरळ दोन सेटमध्ये पराभूत झाली. वँगने सायनाला २१-१३ व २१-१३ अशा सरळ सेटमध्ये सहज हरविले.
Aug 3, 2012, 03:28 PM ISTसायनाचा विजय, भारताला दिलासा
ऑलिंपिक पदकाची प्रबळ दावेदार असलेल्या सायना नेहवालनं आज विजय संपादन केला. स्वीत्झर्लंडच्या सब्रिनाचा अवघ्या २२ मिनिटांत २१-९, २१-४ असा फडशा पाडून सायनानं आपल्या चाहत्यांना खुश करून टाकलं.
Jul 29, 2012, 11:19 PM ISTतमाम भारतीयांच्या नजरा 'सायना'वर...
सायना नेहवाल... बॅडमिंटनमधील चीनी दबदबा मोडीत काढत जागतिक स्तरावर स्वत:चं असं एक वेगळं स्थान सायनानं निर्माण केलंय. तिचं मिशन ऑलिम्पिक आजपासून सरु होतंय. ऑलिम्पिकमध्ये कोट्यवधी भारतीयांना तिच्याकडून मेडल्सच्या अपेक्षा आहेत.
Jul 29, 2012, 09:19 AM ISTआज ऑलिम्पिकमध्ये...
ऑलिम्पिकचा पहिला दिवस भारतासाठी थोडी खुशी थोडा गम ठरला असला तरी आज ऑलिम्पिकमधले भारताचे उरलेले दावेदार मात्र दुसऱ्या दिवसासाठी सज्ज झालेत.
Jul 29, 2012, 09:18 AM ISTऑलिम्पिकमध्ये भारताचे ५ बॅडमिंटनपटू भिडणार
लंडनमध्ये शूटिंग, बॉक्सिंगशिवाय बॅडमिटनमध्येही भारताला मेडल्स अपेक्षा असणार. जबरदस्त फॉर्मात असलेली सायना नेहवाल, पी.कश्यप मेडल्ससाठी प्रबळ दावेदार आहेत. तर ग्लॅमरस ज्वाला गुट्टाही अश्विन पोनप्पा आणि व्ही. दिजूसह जलवा दाखवण्याची क्षमता ठेवते.
Jun 27, 2012, 10:24 AM ISTसायना नेहवाल ओपन सीरिजची अजिंक्य
सायना नेहवालनं चीनच्या जुएरूई ली ला 21-13, 20-22,19-21 नं पराभूत करत इंडोनेशिया ओपन सुपर सीरिजचं अजिंक्यपद पटकावले आहे.
Jun 17, 2012, 02:55 PM IST