बिबट्याची निर्घृण हत्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महान गावच्या जंगलात एका बिबट्याचं मृत शरीर सापडलंय. अत्यंत क्रूर रितीनं या बिबट्याची हत्या करून त्याच्या शरीराचे तुकडे – तुकडे करण्यात आलेत.
Jun 23, 2012, 11:12 AM ISTकोकणात संततधार; रेल्वे चार तास उशिराने
कोकण रेल्वेला जोरदार पावसाचा फटका बसला. मात्र, लांजा ते आडवली दरम्यान कोसळलेली दरड हटविण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक चार तासान उशिराने धावत आहे. कोकणमध्ये संततधार पाऊस सुरू झाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपून काढले आहे. मालवण येथे माड कोसळून एक जण जखमी झाला.
Jun 18, 2012, 10:23 AM IST'सिंधुदुर्ग'चा बंद झाला मार्ग
सिंधुदुर्ग किल्ल्यावर पर्यटकांना घेऊन जाणारी प्रवासी वाहतूक सोमवारपासून बंद करण्यात आली आहे.पावसाळ्यात चार महिने समुद्र खवळलेला असतो.म्हणून पावसाचे चार महिने ही वाहतूक बंद ठेवण्यात येते.
Jun 4, 2012, 01:59 PM ISTउद्धव ठाकरेंनी केली नवसपूर्ती...
मुंबई महापालिकेवर विजय मिळवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सिंधुदुर्गातल्या पाट-परुळे इथल्या रवळनाथाच्या चरणी नवसपूर्ती केली. उद्धव यांच्यासह मनिल परब, विनायक राऊत, महापौर सुनिल प्रभू यांनीही रवळनाथाचं दर्शन घेतलं.
May 7, 2012, 04:20 PM ISTकोकणने का बदल स्वीकारलेत?
सुरेंद्र गांगण
कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो निसर्ग. मात्र, या निसर्गावर लाकूड व्यापाऱ्यांनी घाला घालून निसर्गाची पैशासाठी लूट केली आहे. महाराष्ट्रातील जवळपास निम्मा जंगलभाग हा कोकणात होता. आता हे प्रमाण घटत आहे. हे सांगण्याचे कारण की, कोकणच्या वातावरणाला पोषक असे उद्योग आले नाही. मात्र, वातावरण बिघडविणारे प्रकल्प आणले गेलेत. यातून राजकारणही केलं गेलं, ते आजही सुरू आहे.
आंगणेवाडीत लाखो भाविक दाखल
कोकणातल्या प्रसिद्ध अशा आंगणेवाडीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. श्री भराडी देवीच्या यात्रेनिमित्त आज आंगणेवाडीत भक्तीचा महापूर लोटला. सालाबादप्रमाणे यंदाही आंगणेवाडीची यात्रा भगव्या वातावरणात फुलून गेली आहे. मात्र मुंबई ठाण्यातल्या निवडणूक निकालानंतर अनेक राजकारणी नवस फेडण्यासाठी आंगणेवाडीला येतायत. त्यामुळे यात्रेच्या निमित्ताने आंगणेवाडीत राजकारण्यांची जत्राच भरणार आहे.
Feb 25, 2012, 02:16 PM ISTराणे आज करणार राष्ट्रवादीचे वस्त्रहरण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यात पुन्हा धुमशान होणार आहे. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी थेट राष्ट्रवादीच्या नेत्यांचं वस्त्रहरण करण्याचा इशारा दिलाय. त्यामुळं या दोन पक्षातला संघर्ष पुन्हा झडणार आहे.
Jan 31, 2012, 08:23 AM ISTआघाडीत बिघाडी, कोकणाकडे लक्ष
कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी न होता बिघाडी झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसचा कस लागणार आहे.
Jan 28, 2012, 05:04 PM ISTसिंधुदुर्गात ८० मतदान केंद्र संवेदनशील
सिंधुदुर्गात १०४६ पैकी एकूण ८० मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी सर्वाधिक ३३ मतदान केंद्रे कुडाळ तालुक्यात आहेत.
Jan 18, 2012, 04:46 PM ISTराणेंचा लागणार झेडपीत कस….
सिंधुदुर्गात आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा फड रंगू लागलाय.... जिल्ह्यातले सर्वशक्तीमान नेते नारायण राणेंविरोधात सर्वपक्ष असंच यावेळच्या लढ्याचं स्वरुप असेल.....
Jan 16, 2012, 08:02 PM ISTमालवणमध्ये होणार काँग्रेसचाच नगराध्यक्ष
प्रतिष्ठेची केलेल्या मालवण नगरपरिषदेवर उद्योग मंत्री नारायण राणे यांचे वर्चस्व दिसून येणार आहे. मालवणमध्ये काँग्रेसचाच नगराध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Dec 23, 2011, 08:16 AM ISTसिंधुदुर्गमध्ये मतदान
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकांसाठी मतदानास सुरुवात झालीय. जिल्ह्यातील मालवण, वेगुर्ला आणि सावंतवाडती मतदानास सुरूवात झालीय. बहुचर्चित वेंगुर्ल्यांत १७ जागांसाठी ५९ उमेदवार रिंगणात आहेत.
Dec 11, 2011, 07:01 AM ISTराणेंच्या विरोधात सिंधुदुर्गात महायुती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत नारायण राणेंच्या विरोधात सर्व विरोधक एकवटलेत. शिवसेना, भाजप, आरपीआय आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं तिथं महायुती केलीय.
Dec 8, 2011, 06:24 AM ISTलक्झरी अपघातात 32 जखमी
लक्झरी बस सिंधुदुर्गातील कणकवलीजवळ गड नदीच्या कोरड्या पात्रात कोसळली. यात 32 प्रवासी जखमी झालेत. दोघांची प्रकृती गंभीर आहे.
Nov 29, 2011, 10:55 AM ISTराणे-जाधव वादाचं लोण मलवणमध्येही !
मालवणमध्ये राणे पिता-पुत्रांच्या पुतळ्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दहन केलं, तर, आता खवळलेले काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मालवणमध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधीर मांजरेकर यांच्या घरावर राणे समर्थकांनी दगडफेक केली.
Nov 8, 2011, 12:55 PM IST