स्पॉट फिक्सिंग

स्पॉट फिक्सिंग : रणजीपटू बाबुराव यादवला अटक

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी माजी रणजीपटू बाबुराव यादव याला अटक करण्यात आलीय.

May 21, 2013, 09:46 AM IST

फिक्सिंगचं `महा`कनेक्शन

सिर्फ खेलनेका का नाहीं,फिक्सिंगभी करनेका ! महाराष्ट्राचं फिक्सिंग कनेक्शन उघड ! फिक्सिंगप्रकरणात विदर्भाच्या रणजीपटूला अटक ! आणखी किती आहेत महाराष्ट्रात फिक्सर ? फिक्सिंगप्रकरण आणखी कोणाला भोवणार ?

May 20, 2013, 11:20 PM IST

स्पॉट फिक्सिंगचं `महाराष्ट्र कनेक्शन` उघड

स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन उघड होतंय. या प्रकरणी आणखी तिघांना औरंगाबादमधून अटक करण्यात आली आहे.

May 19, 2013, 08:45 PM IST

क्रांती म्हणते "श्रीशांतसोबत `ती` मी नव्हेच!"

श्रीशांत आणि मॅच फिक्सिंग प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं अभिनेत्री क्रांती रेडकर हिनं स्पष्ट केलय. श्रीशांतला कधीही भेटले नसल्याचं तिनं म्हटलंय. सध्या कोकणात कुडाळमध्ये चित्रिकरणात असल्याचंही क्रांतीनं सांगितलं.

May 19, 2013, 07:43 PM IST

श्रीसंत-जिजूनं बूक केलेल्या हॉटेल रुमवर धाड

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीसंत आणि जिजू जनार्दन यांच्याविरुद्ध आणखी काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत. ही माहिती मुंबई क्राईम ब्रान्चच्या वतीनं सह-आयुक्त हिमाशू रॉय यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

May 18, 2013, 05:35 PM IST

फिक्सिंगचं अंडरवर्ल्ड!

श्रीशांत...अजित चंडेला ...अंकित चव्हाण... या तीन क्रिकेटपटूंनी क्रिकेटला काळीमा फासलाय...आयपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान स्पॉट फिक्सिंग केल्याचा या तिघांवर आरोप आहे....

May 16, 2013, 11:26 PM IST

आयपीएल आणि महाराष्ट्रातला दुष्काळ!

आयपीएल म्हणजे इंडियन पाप लीग..क्रिकेटच्या या पाप लीगमुळे भारतीय क्रिकेटचं नुकसानंच झालंय. एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळ असताना क्रिकेटला बदनाम करणा-या लीग गरजच काय असा प्रश्नही उपस्थित होतोय.

May 16, 2013, 06:40 PM IST

आयपीएलनं लावलाय कलंक

आयपीएलमधल्या स्पॉट फिक्सिंगमुळे प्रेक्षकांचा विश्वासघात झालाय. जंटलमन गेम म्हणून ओळखल्या जाणा-या या खेळाला आयपीएलनं कलंक लावलाय. आयपीएलच्या या नौटंकीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता या सर्व क्रिकेटवेड्या प्रेक्षकांचा विश्वासघात झालाय.

May 16, 2013, 05:16 PM IST

अबब...आयपीएलमध्ये ४० हजार कोटींचं फिक्सिंग

आयपीएलमध्ये ४० हजार कोटीचं फिक्सिंग झाल्याचा गौप्यस्फोट दिल्ली पोलिसांनी केलाय. तर ५, ९ आणि १५ रोजीचे सामने फिक्स होते. एका ओव्हरमध्ये १४ रन्स देण्यासाठी ६० लाख रूपये फिक्सिंगमध्ये लावले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

May 16, 2013, 03:31 PM IST

आयपीएलचे दुबईतून फिक्सिंग?

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग थेट दुबईतून करण्यात आल्याचे पुढे येत आहे. या प्रकरणामुळे क्रिकेट वर्तुळात खबळ उडाली आहे. राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडूंना स्पॉट फिक्सिंगप्रकरणात मुंबई आणि दिल्लीतून अटक करण्यात आली. त्यांना बीसीसीआयने खेळाडूंना निलंबित केले आहे.

May 16, 2013, 02:24 PM IST

स्पॉट फिक्सिंगमुळे झाली पोलीस अधिकाऱ्याची हत्या?

स्पॉट फिक्सिंगदरम्यान एस. श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडालिया आणि या राजस्थान रॉयल्सच्या तिन्ही खेळाडुंना बीसीसीआयने आयपीएलमधून सस्पेंड केलंय.

May 16, 2013, 02:17 PM IST

`... त्या खेळाडूंवर आजन्म बंदी घाला`

‘तीनही खेळाडूंना निलंबित करण्याचा बीसीसीआयनं घेतलेला निर्णय योग्यच’ असल्याचं माजी बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय.

May 16, 2013, 01:28 PM IST

स्पॉट फिक्सिंगबाबत आश्चर्य वाटतयं - शिल्पा शेट्टी

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आमच्या तीन खेळाडूंना तपासासाठी बोलावल्याचं समजलं आहे. हे ऐकून आम्हांला आश्चर्य वाटलं आहे. सध्या आमच्याकडे पुरेशी माहिती नाही. आम्ही यासंदर्भात बीसीसीआयच्या संपर्कात आहोत. निष्पक्ष तपास व्हावा यासाठी आमचं पूर्ण सहकार्य तपास अधिकाऱ्यांना मिळेल. खेळाचं स्पिरीट कायम राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यात कोणतीही तडजोड राजस्थान रॉयल्स सहन करणार नाही. शिल्पा शेट्टी राजस्थान रॉयल्स मालक

May 16, 2013, 12:15 PM IST

स्पॉट फिक्सिंग श्रीसंतसह तीन खेळाडूंना अटक

आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. आयपीएलची टीम राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडूंना स्पॉट फिक्सिंगप्रकरणात अटक करण्यात आलीये.

May 16, 2013, 10:08 AM IST

पाकिस्तानी खेळाडू आमिरची जेलमधून सुटका

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी शिक्षा झालेला पाकिस्तानचा मोहम्मद आमिरची इंग्लंडच्या जेलमधून सुटका झाली आहे. गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त आमिर इंग्लंडच्या पोर्टलैंड जेलमध्ये शिक्षा भोगत होता. कोर्टाने त्याला सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली होती.

Feb 2, 2012, 11:41 AM IST