संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी स्वीकारला पदभार
देशाच्या संरक्षण मंत्री म्हणून आज निर्मला सीतारमण यांनी पदभार स्वीकारला आहे. पदाची धुरा हाती घेण्याआधी सीतारमण यांनी पुरोहितांच्या उपस्थितीत कार्यालयात मंत्रोच्चार आणि आशीर्वाद घेतला. यावेळी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह संरक्षण खात्याचे अनेक अधिकारी उपस्थित होते. देशाची लष्करी ताकद मजबूत करण्यावर भर देणार असल्याचं सीतारमण यांनी म्हटलं आहे.
Sep 7, 2017, 12:40 PM IST