election 2017

सेलिब्रिटींचं मतदान : मतदारांना केलं मतदानाचं आवाहन

10 महापालिका आणि 11 जिल्हापरिषदांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. सकाळी साडे सात ते साडे पाच पर्यंत मतदानाची मुदत आहे. जवळपास तीन कोटींहून अधिक मतदार आपला हक्क बजावणार आहेत.

Feb 21, 2017, 09:04 AM IST

नाशकात १२२ जागांसाठी ८५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

नाशिक महानगर पालिकेच्या १२२ जागांसाठी आज मतदान होतंय. शहरातील दिग्गज आणि नवख्या अशा साऱ्याच उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंदीस्त होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

Feb 21, 2017, 08:45 AM IST

३ कोटींहून अधिक मतदार बजावणार आपला हक्क

 10 महापालिका आणि 11 जिल्हापरिषदांसाठी मतदानाला सुरूवात झालीय. सकाळी साडे सात ते साडे पाच पर्यंत मतदानाची मुदत आहे. जवळपास तीन कोटींहून अधिक मतदार आपला हक्क बजावणार आहेत.

Feb 21, 2017, 08:22 AM IST

सोशल मीडियावरील प्रचाराला आळा घालण्यास प्रशासन हतबल

राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रचाराची मुदत संपली आहे. सोशल मीडियावर प्रचार करण्यावरही बंदी आहे. तसे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचे आदेश आयोगाने दिले आहे. मात्र, यामधील मार्गदर्शक तत्वांमध्ये स्पष्टता नसल्याने नेमकी काय कारवाई करावी, हा प्रश्न अधिका-यांना पडला आहे. तसेच या प्रचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणताही प्रभावी उपाय नसल्याने, प्रशासन हतबल झाले असल्याचे चित्र दिसत आहे. 

Feb 20, 2017, 04:20 PM IST

मुंबईसाठी राज्यातील सत्ता पणाला

मुंबईसह राज्यातील 10 महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठी 21 फेब्रुवारी रोजी मतदान होत असले तरी सगळ्यांचे लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीकडे आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत काय होणार याबाबत केवळ राज्यात नाही तर देशातही उत्सुकता आहे. 

Feb 20, 2017, 03:10 PM IST

प्रभादेवीत अपक्ष उमेदवार महेश सावंतांच्या गाडीची तोडफोड

मतदानाच्या आधी प्रभादेवीत रविवारी रात्री राडा झालाय. वॉर्ड क्रमांक 194 मधील अपक्ष उमेदवार महेश सावंत यांची गाडी फोडण्यात आलीय. 

Feb 20, 2017, 11:05 AM IST

उमेदवारांचा आता मतदारांशी व्यक्तिगत भेटीगाठींवर भर

मुंबई ; राज्यातल्या मुंबईसह दहा महापालिका, 11 जिल्हा परिषद आणि 118 पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. महिन्याभरापासून सुरु असलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप, राजकीय पक्षांची एकमेकांवरची चिखलफेक आता थांबली आहे.

Feb 20, 2017, 08:30 AM IST

कोकणात ३ जिल्हा परिषदेच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या

 रायगडमध्ये 59 जागा सिधुदुर्गमध्ये 50 जागा रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 55 जागांसाठी निवडणूक होणार आहे. प्रचाराचा शेवटच्या दिवशी उमेदवारांनी सभा न घेता प्रत्येकजण डोअरटू डोअर प्रचार करत होता तसेच रॅली देखील काढण्यात आल्या.

Feb 19, 2017, 07:07 PM IST