भारतानंतर चीनी मिडियाची अमेरिकेला धमकी
भारताबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आणि भारताला धमकी देणारे चीनी मीडिया आता अमेरिकेला देखील लक्ष्य करत आहेत. चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्यावर हल्ला केला आहे. ट्रंप यांच्या ट्विटवर चीनच्या वृत्तपत्राने म्हटलं आहे की, हा वाद ट्रंपच्या ट्विटने नाही सुधारणार. सोबतच वृत्तपत्राने म्हटलं आहे की, चीन त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेला वगळून अमेरिकेची सुरक्षा नाही करणार. नॉर्थ कोरियाचा सनकी तानाशाह किम जोंगने मिसाईल परीक्षण केल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्विट केलं होतं की, चीन हा मुद्दा सोडवू शकतो.
Jul 31, 2017, 04:40 PM ISTचीनसोबत विवादावर सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक
चीनकडून सीमेवर सुरु असेलेल्या वाढत्या तणावाबाबत मोदी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सुषमा स्वराज यांच्या अध्यक्षतेखाली १४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सर्व पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.
Jul 13, 2017, 01:33 PM IST