Karnataka Election : बजरंग दलाचा मुद्दा पेटला, आता काँग्रेसची भगवान हनुमानाबाबत मोठी घोषणा
Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बजरंग दल आणि हनुमानाच्या मुद्द्यावर भाजपने रान उठवले आहे. पंतप्रधान मोदी यांनी बजरंग दलावर बंदी घालण्याच्या घोषणेची तुलना हनुमान बंदी असल्याचे म्हटले. तसेच माजी उपमुख्यमंत्री केएस ईश्वरप्पा यांनी काँग्रेसचा जाहीरनामा जाळला तर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा जाहीरनामा फाडला. राज्याच्या अनेक भागात मोर्चे काढलेत.
May 5, 2023, 08:38 AM IST'विषकन्या', 'नालायक मुलगा' या वक्तव्यामुळे भाजप, काँग्रेस आमदारांच्या अडचणीत वाढ; निवडणूक आयोगाची नोटीस
Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान मोदी, राहुल गांदी, प्रियंका गांधी आदी प्रचारात सक्रीय झाले आहेत. दरम्यान, प्रचाराच्यावेळी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आणि वैयक्तिक टीका केल्याप्रकरणी निवडणुकी आयोगाने नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई का करु नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
May 4, 2023, 10:54 AM IST105 कोटी रोख, 74 कोटींची दारू आणि 81 कोटींचं सोनं जप्त... मतदानाआधी कर्नाटक पोलिसांची मोठी कारवाई
Karnataka Elections 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणूकीला आता काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. त्यामुळे कर्नाटकात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. येत्या दहा मे रोजी 224 जागांसाठी मतदान (Voting) होणार असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आमिषं दाखवली जात आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) आतापर्यंत राज्यातील विविध भागातून रोख रकमेसह (Cash) दारू (Alcohol), अंमलीपदार्थ (Drugs), दागिने (Gold) जप्त केले आहेत.
May 3, 2023, 09:51 PM ISTकर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध, 'या' गोष्टी मोफत देण्याची मोठी घोषणा
Karnataka Election 2023: काँग्रेसने आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. अनेक गोष्टी मोफत देण्याचे आश्वासन जनतेला दिले आहे. यात मोफत वीज, महिलांसाठी मोफत बस प्रवास याचे आश्वासन देण्यात आले आहे.
May 2, 2023, 11:39 AM ISTकर्नाटकात कोण सरकार स्थापणार? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? पाहा
Karnataka Election 2023: कर्नाटकात सध्या भाजप सत्तेवर आहे. दक्षिण भारतात कर्नाटक हे एकमेव राज्य भाजपकडे आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थीतीत या राज्यात सत्ता कायम राखण्याचं आव्हान भाजपसमोर आहे.
May 1, 2023, 09:27 PM ISTKarnataka Elections: 'वोट फ्रॉम होम'साठी परवानगी, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; पण मतदान करायचं कसं?
Karnataka Elections 2023: कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने (Election Commission) मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने 'वोट फ्रॉम होम'साठी (Vote From Home) परवानगी दिली आहे.
Apr 30, 2023, 03:17 PM IST
Karnataka Elections 2023 : ठाकरे गट कर्नाटक विधानसभेच्या रिंगणात, इतक्या जागा लढवणार
Karnataka Elections 2023 : ठाकरे गट कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार आहे. ठाकरे गटाकडून काही मोजक्याच जागा लढविण्यात येणार आहे. कर्नाटकात भाजपमध्ये मोठी बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर काहींनी पक्षाला रामराम केला आहे. त्यामुळे ठाकरे गट निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याने लक्ष लागले आहे.
Apr 21, 2023, 03:48 PM ISTकर्नाटक निवडणूक : चंद्रकांत पाटील यांना गुलबर्गा उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी
Karnataka Elections 2023 : भाजपने आपली उमेदवार यादी जाहीर केल्यापासून राज्यात पक्षात गोंधळाचे वातावरण आहे. 11 एप्रिल रोजी, भाजपने 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली ज्यात 52 नवीन चेहरे आणि 8 महिला आहेत. 12 एप्रिल रोजी 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली.
Apr 21, 2023, 01:21 PM ISTKarnataka Elections : तेजस्वी सूर्या स्वतःच्याच राज्यात प्रचारापासून वंचित? भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत नाव नाही
Karnataka Elections : भाजपसह काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून बड्या नेत्यांना वगळण्यात आले आहे. भाजपचे फायरब्रँड युवा नेते तेजस्वी सूर्या यांच्यासह काँग्रेसचे सचिन पायलट आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनाही संधी देण्यात आलेली नाही
Apr 21, 2023, 12:08 PM ISTViral Video : बाइकवरुन साखळी चोर आला अन् मग... मायलेकीने काय केलं? बघा हा व्हिडीओ
Mother Daughter Video Viral : आई आणि शाळेकरी मुलगी सायकल रिक्षातून उतरली आणि रस्ता ओलांडताना समोरुन बाइकवर दोन तरुण आले. त्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले अन् मग...
Apr 21, 2023, 11:16 AM ISTखारघर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा; अजित पवार यांचे मुख्यमंत्री, राज्यपालांना पत्र
Kharghar Death Case : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात आतापर्यंत 14 जणांचा बळी गेला आहे. खारघर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. तसेच याप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायची मागणी केली होती.
Apr 21, 2023, 09:36 AM ISTElon Musk यांच्या स्वप्नांचा चुराडा, SpaceX Starship Rocket हवेतच फुटल्यावर अशी दिली रिअॅक्शन; पाहा Video
SpaceX Starship Rocket: इलॉन मस्क आपल्या टीमसह प्रक्षेपण केंद्रावर बसले होते. ज्यावेळी त्यांना रॉकेट फेल गेल्याचं कळालं, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर गमावल्याचं काहीही दु:ख नव्हतं. वैज्ञानिकांनी काही वेळाने रॉकेट फेल गेल्याचं जाहीर देखील केलं.
Apr 21, 2023, 12:29 AM ISTKarnataka Assembly Election Opinion Poll: कर्नाटकामध्ये कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा? Zee News च्या ओपिनियन पोलने सर्वांना दिला धक्का
Karnataka Assembly Election Opinion Poll: कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकींची घोषणा करण्यात आली असून मतदान 10 मे रोजी पार पडणार आहे. त्यानंतर 3 दिवसांनी म्हणजेच 13 मे रोजी कर्नाटकात कोणाचं सरकार स्थापन होईल हे स्पष्ट होईल.
Mar 29, 2023, 07:47 PM ISTKarnataka assembly elections | कर्नाटक विधानसभा निवडणुकांची आज घोषणा, आज आयोगाची पत्रकार परिषद
Karnataka assembly elections announced today
Mar 29, 2023, 10:35 AM ISTKarnataka Assembly Election : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी यांची घोषणा
Karnataka Assembly Election : कर्नाटक विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी तब्बल 124 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि दिग्गज नेते डीके शिवकुमार यांच्या नावांला पसंती देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपमधून काही नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
Mar 25, 2023, 10:16 AM IST