झी मराठीची नवी मालिका ‘जाडूबाई जोरात’
वजन हा आपल्या शरीराचा भाग असतो परंतु वजन म्हणजेच पूर्ण शरीर नसतं किंवा ती आपली ओळखही नसते. असं असलं तरी आपल्याकडे एखाद्याची शारिरीक व्याधी, व्यंग किंवा वेगळेपणा हा त्याची ओळख बनतो. म्हणजे कुणाची उंची कमी असेल तर त्याला बुटका, ठेंगणा म्हणणं, कुणाचं वजन जास्त असलं तर जाड्या म्हणणं असे प्रकार आपण करतो. यामध्ये अनेकदा समोरच्याची मस्करी करण्याचा प्रयत्न असतो तर कधी कमी लेखण्याचा पण यामुळे त्या व्यक्तिच्या भावनाही दुखत असतील याचा विचार फार कमी जण करतात. अशाच कमी लेखण्यातून काय घडू शकतं ? याची गंमतीदार गोष्ट बघायला मिळणार आहे ‘जाडूबाई जोरात’ या झी मराठीच्या नव्या मालिकेमधून. येत्या २४ जुलैपासून सोमवार ते शनिवार दुपारी १ वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
Jul 20, 2017, 04:31 PM ISTरात्रीस खेळ चालेच्या सरिता वहिनींची नवी भय मालिका...
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेत आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री अश्विनी मुकादम म्हणजे सरिता वहिनी आता झी युवाच्या नव्या मालिकेत दिसणार आहे. गर्ल्स होस्टेल असे या मालिकेचे नाव असून अश्विनी या मालिकेत गर्ल्स हॉस्टेलच्या वॉर्डनच्या भूमिकेत आहे.
Jul 10, 2017, 08:24 PM IST'कारे दुरावाची' सुरूची अडारकर नव्या प्रोफेशनमध्ये...
झी युवावर २२ मे पासून सोमवार ते शुक्रवार , रात्री ८ वाजता एक नवीन मालिका सुरु होत आहे . या मालिकेचे नाव आहे "अंजली". ही मालिका हॉस्पिटलच्या कारभारावर आधारित असून एका इंटर्न म्हणून रुजू झालेल्या आणि डॉक्टर बनण्याची स्वप्ने असलेल्या अंजलीची ही गोष्ट आहे.
May 19, 2017, 08:10 PM ISTप्रथमेश परबला उंची वाढविण्यासाठी उभे राहावे लागले विटांवर...
कमी उंची असलेल्या अभिनेत्याला काय काय करावे लागते, हे आपल्याला शाहरुख खान -दीपिका, सलमान खान-सुष्मिता सेन यांच्या जोड्यांवरून दिसत असेल. पण आता मराठीतही कमी उंचीच्या अभिनेत्याला उंच दाखविण्यासाठी चक्क विटांवर उभे करण्यात आले आणि फोटो काढण्यात आले.
Mar 9, 2017, 10:24 PM IST‘चूकभूल द्यावी घ्यावी’ खुसखुशीत नात्याची गंमत
‘चूकभूल द्यावी घ्यावी’ ही कथा राजाभाऊ आणि मालती या वयोवृद्ध दाम्पत्याची आहे. वय झालं असलं तरी या जोडीतील प्रेम आज वयाच्या ऐंशीव्या वर्षीही कायम आहे. जसं प्रेम आहे तसंच या नात्यात एक खट्याळपणासुद्धा आहे.
Jan 14, 2017, 03:15 PM ISTझी मराठीवर 'नकटीच्या लग्नाला यायचं हं...'
झी मराठीवर नकटीच्या लग्नाला यायचं हं ही नवी मालिका लवकरच सुरु होतेय. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसलेली प्राजक्ता माळी पुन्हा एकदा या मालिकेतून मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Jan 2, 2017, 02:32 PM ISTझी मराठीवर येतेय नवी मालिका "चूक भूल द्यावी घ्यावी"
नाटक, सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर पुन्हा एकदा छोटया पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येतायत.
Dec 24, 2016, 09:52 AM ISTकाय आहे शौर्य मालिकेची थीम... जाणून घ्या...
शौर्य म्हणजे असाधारण वीरता, शौर्य म्हणजे जाज्वल्य अभिमान, शौर्य म्हणजे अफाट शूरता, आणि म्हणूनच शौर्य म्हणजे महाराष्ट्र पोलीस. महाराष्ट्र पोलिसांची महिती खूप मोठी आहे आणि ती एवढ्या मोजक्या शब्दात वर्णन करता येणार नाही.
Nov 7, 2016, 07:53 PM IST3 दिवसांनी ही मुलगी पसंत पडणार का ?
लग्न ठरवताना वधू-वरांच्या पत्रिका बघायच्या का नाही, यावरुन बरेच वाद होतात. या वादवरच भाष्य करणारी नवी मालिका 'पसंत आहे मुलगी' झी मराठीवर सुरु होत आहे.
Jan 22, 2016, 08:54 PM IST'बाईचं दुखणं,बाईलाच कळतं', 'माझे पती सौभाग्यवती' 28 सप्टेंबरपासून झी मराठीवर
झी मराठी नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर मालिका बनवत असते. नातेसंबंध त्यातील मधुरता, प्रेम कसं टिकवून ठेवायचं हे सांगण्याचा प्रयत्न या मालिकांमधून होत असतो. अशीच एक नवी मालिका 'माझे पती सौभाग्यवती' येत्या 28 सप्टेंबरपासून झी मराठीवर सुरू होतेय.
Sep 24, 2015, 03:44 PM IST